Satara Farming : जिल्ह्यातील खरिपातील पेरण्याची कामे अंतिम टप्प्यात आल्या आहेत. जिल्ह्यात शुक्रवारअखेर खरिपाच्या एकूण दोन लाख ९७ हजार ९११ हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी दोन लाख ४४ हजार ६३० हेक्टरवर म्हणजेच ८२ टक्के प्रत्यक्ष पेरणी पूर्ण झाली आहे. शेतकऱ्यांकडून पिकांत सर्वाधिक पेरणी सोयाबीनला पसंती दिली असून सोयाबीनची ८४ हजार २१९ हेक्टरवर लागवड झाली आहे. .काही भागात भुईमुगाची उगवण कमी प्रमाणात झाली असून या बाबत शेतकऱ्यांनी कृषी सहायकांकडे लेखी तक्रार नोंदविण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. जिल्ह्यात मागील चार दिवसांत झालेल्या दमदार पाऊस खरिपातील पिकांना पोषक ठरला आहे. जावळी व महाबळेश्वर तालुक्यांचा अपवाद वगळता इतर नऊ तालुक्यात ७० टक्क्यांवर पेरणीची कामे उरकली आहेत..Kharif Crop Inspection Delay : खरीप पीक पाहणीला अद्याप मुहूर्त नाही .जिल्ह्यात खरिपासाठी दोन लाख ९७ हजार ९११ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी दोन लाख ४४ हजार ६३० हेक्टरवर म्हणजेच ८२ टक्के प्रत्यक्ष पेरणी पूर्ण झाली आहे. यामध्ये सर्वाधिक सोयाबीन पिकांची लागवड झाली आहे. सोयाबीनचे ९२ हजार ८७५ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून यापैकी ८४ हजार २१९ हेक्टरवर लागवड झाली आहे. भाताची २१,४०४ हेक्टर (४५ टक्के) लागवड पूर्ण झाली आहे. चार ते पाच पावसामुळे भात लागणी वेगात सुरू आहेत..Kharif Crop Insurance 2026: खरिपासाठी सुधारित पीकविमा योजना .चारा पिकांच्या दृष्टीने मका पिकास शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. मक्याची २३,८७२ हेक्टर (१८२ टक्के) लागवड झाली आहे. भुईमूग पिकांचे २९,६५७ हेक्टर (९६ टक्के) लागवड झाली आहे. काही ठिकाणी भुईमूग बियाणे उगवण कमी झाल्याची तक्रार होत असून बियाण्यात दोष किंवा कमी उगवण क्षमता आढळल्यास शेतकऱ्यांनी तत्काळ कृषी सहायकांशी संपर्क करावा. तसेच बियाणे खरेदीची मूळ पावती (पक्के बिल), बियाण्याचे वेष्टन (बॅग/टॅग) व शिल्लक बियाणे सुरक्षित ठेवावे. तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी किंवा कृषी सहाय्यक यांच्याकडे त्वरित लेखी तक्रार नोंदवावी. कृषी विभागाची तक्रार निवारण समिती प्रत्यक्ष शेतावर भेट देऊन पंचनामा करेल व पुढील नुकसान भरपाई/कारवाईसाठी अहवाल सादर केला जाणार आहे..तालुकानिहाय पेरणी टक्केवारी (ऊस वगळून)खंडाळा सर्वाधिक १०२, खटाव ९८, कराड ९१, फलटण ९१, कोरेगाव ८९, माण ८७, सातारा ७४, वाई ७४, पाटण ७३, जावली ४३ आणि महाबळेश्वर तालुक्यात सर्वात कमी ३०..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.