Grape Orchard : कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्ष बागा वाचविण्यासाठी लगबग

Grape Damage Condition : तापमानाचा पारा निम्म्यावर घसरल्याने परिसरातील काढणीसाठी आलेल्या द्राक्ष बागांमध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या.
Grape Orchard
Grape OrchardAgrowon
Published on
Updated on

Nashik News : निफाड गहू संशोधन केंद्रावर रविवारी (ता. १४) १२.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले होते. तर दुसऱ्या दिवशी सोमवारी (ता.१५) तापमान १२.२ अंश सेल्सिअस एवढे होते. पारा निम्म्यावर घसरल्याने परिसरातील काढणीसाठी आलेल्या द्राक्ष बागांमध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या.

सप्ताहात तापमानात चढ-उतार दिसून आले. मात्र गारठा वाढल्याने शेतकरी धास्तावले असून द्राक्ष बागा वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सकाळी ठिबकद्वारे पाणी, तर शेकोटी पेटवण्यास सुरुवात झाली आहे.

Grape Orchard
Grape Farming : बुलढाणा जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक निसर्गापुढे हतबल

जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस छाटलेल्या द्राक्ष बागांमध्ये काढणीस सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी मण्यात साखर उतरण्याची अवस्था आहेत, तर काही बागेत खुडे सुरू झाले आहेत. मात्र थंडीचा प्रकोप वाढल्याने आता साखर उतरण्यात अडचण येत असून खुडे लांबणीवर जात आहेत.

काही ठिकाणी द्राक्ष मण्यांना केसासारखे बारीक तडे जाण्याची समस्या दिसून आली आहे. गेल्या वर्षीच्या डिसेंबर ते यंदाच्या जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या सप्ताहापर्यंत थंडीचा कडाका कमी होता.

मात्र आता पारा घसरल्याने काही ठिकाणी द्राक्षमण्यांना तडे जाण्याची भीती आहे.
कडाकाच्या थंडीपासून द्राक्षबागा वाचविण्याससाठी पहाटे ठिबकद्वारे सिंचन व शेकोटी पेटवून धूर करून ऊब देण्यासारखे उपाय शेतकऱ्यांना करावे लागत आहेत.

Grape Orchard
Grape Disease : बुरशी, जीवाणूजन्य करपा रोगाने द्राक्ष बागा उद्‌ध्वस्त
सध्या निफाड तालुक्यात दिवसा कडक ऊन व रात्री थंडी, असे वातावरण आहे. रात्री थंडीचे प्रमाण वाढते. पहाटे पडणारे दव, धुके व थंडीचा फटका द्राक्ष बागेला बसत आहे. द्राक्षमण्यांच्या फुगवणीवर विपरित परिणाम होणार आहे. त्यामुळे द्राक्ष बागा वाचविण्यासाठी बळीराजाची धावपळ होत आहे.
सुनील गवळी,द्राक्ष उत्पादक, ब्राह्मणगाव विंचूर
माल तयार होणाऱ्या अवस्थेतील बागेत द्राक्ष मण्यांना केसासारखे बारीक तडे जाण्याची शक्यता आहे. तर उशिराच्या बागेत डीपिंग, विरळणी अशी कामे सुरू असणाऱ्या बागेत भुरी व डाउनीची शक्यता आहे. वातावरण बदलाचा फटका आहे. मिलीबग काही ठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे पीकसंरक्षण खर्चात वाढ झाली आहे.
- रवींद्र निमसे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, नाशिक विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com