Farmers Company : शेतकरी कंपन्यांकडून मूल्यसाखळीचे प्रभावी व्यवस्थापन आवश्यक

MahaFPC : महाफार्मर्स प्रोडूसर कंपनी (महाएफपीसी) आणि सिमासेस लर्निंग (एसआयआयएलसी) यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय प्रशिक्षण पार पडले.
FPC
FPCAgrowon
Published on
Updated on

Raigad News : ‘शेतकऱ्याचा बाजारातील सहभाग आणि वाटा वाढण्यासाठी शेतकरी उत्पादक संस्थांनी पुढे येत प्रमुख पिकांशी संदर्भात मूल्यसाखळीचा विकास आणि प्रभावी व्यवस्थापन करणे महत्त्वाचे ठरेल,’ असा संदेश शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रशिक्षणादरम्यान मार्गदर्शकांनी दिला.

महाफार्मर्स प्रोडूसर कंपनी (महाएफपीसी) आणि सिमासेस लर्निंग (एसआयआयएलसी) यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय प्रशिक्षण पार पडले.

केंद्र सरकारच्या ‘१० हजार शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना व प्रोत्साहन’ या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत नाबार्ड आणि एनसीडीसीच्या मार्गदर्शनाखाली, सीबीबीओ महाफार्मर्स प्रोडूसर कंपनी (महाएफपीसी)द्वारे रायगड जिल्ह्यात स्थापन झालेल्या ६ शेतकरी उत्पादक संस्थांच्या संचालक मंडळांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण येथील स्वामी विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये नुकतेच (ता.२८ व २९ ऑगस्ट) आयोजित करण्यात आले होते.

FPC
Farmer Company : ‘नेटवर्थ’च्या नव्या अटीमुळे शेतकरी कंपन्या अडचणीत

प्रशिक्षणामध्ये श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, रोहा, सुधागड पाली आणि अलिबाग या तालुक्यांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या ५ शेतकरी उत्पादक कंपन्या आणि एक सहकारी शेतकरी उत्पादक संस्था यांचे संचालक, सीईओ आणि अकाउंटंट सहभागी झाले होते. यावेळी नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी प्रदीप अपसुंदे यांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी कशा प्रकारे तयारी आवश्यक असल्याबाबत मार्गदर्शन केले.

FPC
Farmers Producers Company : शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करताना...

महाएफपीसीचे संचालक योगेश थोरात यांनी वेळेचे महत्त्व विषद करत शेतकरी कंपन्यांनी आपल्या व्यवसायासाठी प्रभावी, कालबद्ध आराखडा तयार करून प्रत्यक्ष कार्यवाही करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच शासकीय मार्गदर्शनाखाली पहिल्या तीन वर्षांत कंपनी आत्मनिर्भर बनेल अशा प्रकारे व्यवसाय विकास करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

सिमासेस लर्निंगचे प्रकल्प व्यवस्थापक जयप्रकाश कुलकर्णी यांनी कृषी मूल्यसाखळीची संकल्पना तसेच व्यवसाय आराखडा संकल्पना मांडत कृषिमूल्य साखळीच्या विकासासाठी व्यापक प्रयत्न राबवण्यासाठी संचालक मंडळाने सज्ज होण्याचे आवाहन केले.

महाएफपीसीच्या क्षेत्रविशेषज्ञ शिल्पा साठे, कृषिमूल्यसाखळी सल्लागार कनक खरे, कंपनी सेक्रेटरी श्याम पाटील, मॅग्नेट प्रकल्पाचे प्रकल्प प्रमुख तुषार जंगम यांनी विविध सत्रांच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक संस्थांच्या व्यवसाय विकास करण्याबाबत मार्गदर्शन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com