Mohanrao Hapse
Mohanrao HapseAgrowon

Mohanrao Hapse : शिक्षण तज्ज्ञ मोहनराव हापसे यांचे निधन

Education Specialist Mohanrao Hapse : राज्य शासनाने चार दशकांपूर्वी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केलेले शिक्षण तज्ज्ञ डॉ. मोहनराव हापसे यांचे नुकतेच निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.

अॅग्रोवन वृत्तसेवा
Pune News : पुणे ः राज्य शासनाने चार दशकांपूर्वी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केलेले शिक्षण तज्ज्ञ डॉ. मोहनराव हापसे यांचे नुकतेच निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे माजी अध्यक्ष व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी उपकुलगुरू असलेले डॉ. हापसे यांच्या मागे पत्नी श्रीमती विजया, मुलगा, चार मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.

प्रवरा नदीकाठच्या नेवासा बुद्रुक गावात हापसे यांचा शेतकरी कुटुंबात जन्म झाला. मात्र कुशाग्र बुद्धी शिक्षणाची आवड असलेल्या मोहनरावांनी शेतीकाम सांभाळून दहावीत प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी पुण्याच्या राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेतून (एनसीएल) आचार्य पदाची पदवी संपादन केली.

Mohanrao Hapse
Iran President Ebrahim Raisi : हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्राध्यक्ष रईसी यांचे निधन

उच्चशिक्षण व संशोधन अमेरिकेत केल्यानंतर संधी असतानाही ते विदेशात स्थायिक न होता भारतात परतले. शिवाजी विद्यापीठात रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून ते काम करू लागले. त्यांचे शिक्षणातील कर्तृत्व पाहून पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी त्यांना प्रवरानगरात नव्याने स्थापन केलेल्या महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी नियुक्त केले. त्यांनी शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी मदत आणि मार्गदर्शन केले. मुलांच्या निवासाची सोय करून दिली. ‘कमवा व शिका’ या संकल्पनेला डॉ. हापसे यांनी प्रोत्साहन दिले व त्यांच्या सान्निध्यातील अनेक मुले पुढे विदेशात उच्चशिक्षणासाठी गेली.

१९८३ मध्ये राज्य शासनाने आदर्श शिक्षक पुरस्कार देत डॉ. हापसे यांचा गौरव केला. १९९० मध्ये त्यांची पुणे विद्यापीठाच्या उपकुलगुरूपदी निवड केली गेली. शिक्षण क्षेत्रातील या महर्षीचे निधन झाल्यानंतर राज्याच्या विविध शिक्षण संस्थांनी त्यांना आदरांजली वाहिली. शुक्रवारी (ता. २४) अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर मार्गावरील प्रवरासंगम येथील रामेश्‍वर मंदिर येथे सकाळी ९ वाजताना त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com