E 20 Petrol: ‘ई-२०’ पेट्रोल वाहनांसाठी योग्यच; पत्रकार परिषदेत तज्ज्ञांचा दावा
Ethanol Fuel: देशात सध्या समाजमाध्यमांमध्ये ‘ई-२०’ इंधन हा विषय बहुचर्चित आहे. गाडीची इंधनाची कार्यक्षमता (मायलेज) कमी होण्यासह इंजिनचे संभाव्य नुकसान याबाबत ऊर्जा क्षेत्रातील दिग्गज तज्ज्ञांनी पुढाकार घेत भारताच्या वेगाने विस्तारणाऱ्या ‘ई-२०’ (२० टक्के इथेनॉल-मिश्रित) पेट्रोलच्या धोरणाबाबत लोकांचा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न करत ग्राहकांच्या चिंतांचे निरसन केले.