Beed News : खरीप हंगाम २०२५-२६ साठी सुरू असलेली ई-पीक पाहणी मोहीम अजूनही मंद गतीने सुरू असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात एकूण २१ लाख ८६ हजार ५४८ प्लॉट्स पाहणीस पात्र आहेत. त्यापैकी केवळ ४ लाख १ हजार १७८ प्लॉट्स (१८.३५ टक्के) नोंदवले गेले आहेत..शासनाने कृषी विभागाच्या विविध योजनांचा व नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई-पीक पाहणी करणे अनिवार्य केले आहे. पण गेल्या पंधरा दिवसांपासून ई-पीक ॲपचे सर्व्हर डाऊन आल्याने त्यात नोंदणीमध्ये अल्प प्रतिसाद मिळत आहे. .E-Peek Pahani : ‘ई-पीकपाहणी’चा खोळंबा.यामुळे जिल्ह्यातील शेतकरी शासनाच्या अनुदानापासून वंचित राहू शकतात. आपल्या शेतात पिकलेल्या पिकांची माहिती सरकारला देण्यासाठी मागील चार वर्षापासून ई- पीक पाहणीची प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे. यंदा ई-पीक पाहणी करू न शकलेल्या शेतकऱ्यांना सरकारी मदत तसेच.पीक विम्यापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. कारण सरकारने शेतकऱ्यांना मदत देताना ई- पीक पाहणी बंधनकारक केली आहे. यामध्ये जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधवांना स्मार्ट फोन मधील ॲपची पुरेपूर माहिती नसल्याच्या कारणामुळे त्याचबरोबर ॲपचे सर्व्हर डाऊन असल्यानेही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अल्प प्रतिसाद मिळाला आहे..E-Peek Pahani : कापूस, सोयाबीनची ई-पीक पाहणी गरजेची.तालुकानिहाय स्थितीकेज तालुका आघाडीवर असून येथे ३३.५८% नोंदणी (९३,४१४ प्लॉट्स / ४६,६७० हेक्टर) झाली आहे. माजलगाव – ३०.३५%, अंबाजोगाई – ३१.५६%, परळी – २९.०३%, वडवणी – २०.३% इतकी नोंदणी झाली आहे. बीड तालुक्यात सर्वाधिक पात्र प्लॉट्स (३.८७ लाख) असून त्यापैकी फक्त १४.८५% (५७,८५० प्लॉट्स) ची नोंद झाली आहे. आष्टी (४.३८%), पाटोदा (६.५२%), शिरूर (११.७७%) या तालुक्यांमध्ये नोंदणी अत्यल्प आहे..ई-पीक पाहणी नोंदणी म्हणजे फक्त औपचारिकता नाही. भरपाई, पीक कर्ज, अनुदान, शासकीोय खरेदीसाठी ही नोंदणी अत्यावश्यक आहे. शेतकरी बांधवांनी अंतिम तारखेपूर्वी नोंदणी पूर्ण करावी.- चंद्रकांत शेळके, तहसीलदार.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.