Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यात शनिवार (ता. १३) पर्यंत यंदाच्या खरीप हंगामातील ४ लाख ९२ हजार ७०४ हेक्टर क्षेत्रावरील ई पीक पाहणी झाली आहे. शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणीस शनिवार (ता. २०) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे..परभणी जिल्ह्यात ई -पीक पाहणी करावयाच्या प्लॉटची एकूण संख्या ७ लाख ४५ हजार ८०५ असून त्यापैकी ३ लाख ३४ हजार ६७८ प्लॉट (४४.८७ टक्के) नोंदणी झाली आहे. शनिवार (ता. १३) पर्यंत एकूण ३ लाख ५ हजार ४७९ हेक्टर क्षेत्राची ई पीक पाहणी झाली..E-Peek Pahani : ई-पीकपाहणी अल्पच; ६६ टक्के क्षेत्र नापेर.हिंगोली ई पीक पाहणी कराव्याच्या प्लॉटची एकूण संख्या ४ लाख ९५ हजार ९१२ असून त्यापैकी २ लाख ७हजार २३३प्लॉट (४१.७९ टक्के) नोंदणी झाली आहे. शनिवार (ता. १३) पर्यंत एकूण १ लाख ८७ हजार २२५ हेक्टर क्षेत्राची ई पीक पाहणी झाली.शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणीसाठी रविवार (ता. १४) पर्यंतची मुदत होती..परंतु राज्याच्या विविध जिल्ह्यात अतिवृष्टी, दुबार पेरणी आदी कारणामुळे शेतकरी ई-पीक नोंदणी करू शकले नाहीत. शेतकरी ई-पीक पाहणी पासून वंचित राहू नयेत यासाठी शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणीसाठी शनिवार (ता. २०) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे..E-Peek Pahani : ई-पीक पाहणीसाठी २० सप्टेंबरची मुदत.राज्य शासनाच्या महसूल विभागअंतर्गंत जमाबंदी आयुक्त व संचालक भुमिलेख मार्फत ‘माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीक पेरा’ या संकल्पनेनुसार ई-पीक पाहणी प्रणाली राबविली जात आहे. ई-पीक पाहणीमुळे विविध पिकांचे स्थळकाळानुसार पेरणी क्षेत्र निश्चित होते. .या आकडेवारीच्या आधारे पीकविमा परतावा, विविध कारणांनी झालेल्या पीक नुकसानीबद्दल आर्थिक मदत देण्यासह, किमान आधारभूत किंमतीसह शेतीमालाचे आयात-निर्यात धोरण ठरविण्यासाठी शासनास मदत होते. ई-पीक (डिसीएस) अॅप वापरासाठी अॅड्रॉरॉईड ४.४ मोबाईल किंवा त्यावरील प्रणाली आवश्यक आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.