Nanded News : गेल्या पंधरा दिवसांपासून ई-पीक पाहणी पोर्टल सतत डाऊन आहे. त्यामुळे नोंदणी न होऊ शकल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. एकीकडे अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, दुसरीकडे तांत्रिक अडचणी आणि प्रशासकीय दिरंगाई यामुळे पीक विम्यासाठी अर्जही करता येत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे..पीक नुकसान भरपाई मिळावी या आशेने शेतकऱ्यांनी हजारो रुपये भरून विमा हप्ता जमा केला. मात्र, ई-पीक पाहणी नोंदणी न झाल्यास विमा मंजूर होणार नाही, यामुळे शेतकरी मोबाइलवर नोंदणी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. .E-Peek Pahani : सोलापुरात ई-पीकपाहणीत ‘सर्व्हर डाउन’चा अडथळा.पण सततचा सर्व्हर डाऊन आणि नेटवर्क अडचणींमुळे ही प्रक्रिया रखडली आहे. विशेषतः हणेगाव, येडुर, बिजलवाडी, कुंमारपल्ली, करडखेड, मरखेल, माळेगाव, वझर, शिळवणी, लोणी, खुतमापुर, कोकलगाव व परिसरातील अनेक गावांमधील शेतकरी या अडचणीत अडकले आहेत..E Peek Pahani: खरीप ई-पीक पाहणीचे ‘तीन तेरा’.शेतकऱ्यांची मागणीई-पीक पाहणी पोर्टल तातडीने सुरळीत करावे, पीक विमा अर्जांची अंतिम तारीख वाढवावी, महसूल विभागाच्या कारभारावर चौकशी करावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळावी..मनमानीवर शेतकऱ्यांचा रोषतांत्रिक अडचणीसोबतच महसूल विभागातील मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांना ‘शेती फेर’ करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तलाठी वेळेवर कार्यालयात नसणे, कामासाठी वारंवार चकरा माराव्या लागणे, तसेच मंडळ अधिकाऱ्यांनी आर्थिक व्यवहाराशिवाय फेर प्रस्ताव निकाली काढू नये, असा अघोषित आदेशच दिल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.