Agriculture Department : रिक्त पदांमुळे बाळापूरमध्ये कृषी विभागाचा कारभार बिकट

Agriculture Vacancy : बाळापूर तालुक्यात कृषी विभागात सुमारे ५० टक्के पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीवर मोठा परिणाम झाला आहे.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon

Akola News : जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात कृषी विभागात सुमारे ५० टक्के पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीवर मोठा परिणाम झाला आहे. तालुका कृषी अधिकारी या प्रमुख पदासह इतर पदे महिनोमहिने रिक्त राहत असून वरिष्ठांचे दुर्लक्ष शेतकऱ्यांसाठी मारक ठरले आहे. या ठिकाणी तातडीने रिक्तपदे भरण्याची मागणी केली जात आहे.

बाळापूर तालुक्यात कृषी विभागात ५० पदे मंजूर असून यापैकी २४ पदे रिक्त आहेत. यात एक तालुका कृषी अधिकारी, एक कृषी अधिकारी, कृषी सहायकाची १२ पदे, अनुरेखक ४ पदे, लिपिक एक, वाहनचालक एक, शिपाई ३ पदे, चौकीदार १ पद रिक्त आहे. जवळपास वर्षभरापासून बाळापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तालुका कृषी अधिकारी नसल्यामुळे विभागातील कर्मचाऱ्यांना कमालीची कसरत करावी लागते आहे.

Agriculture Department
Agriculture Department : ‘दक्षता’चे उपसंचालकपद अखेर किरण जाधव यांच्याकडे

भरलेली व रिक्‍त पदे समसमान झालेली असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांकडे कामाचा व्याप प्रचंड प्रमाणात वाढला आहे. २६ कर्मचाऱ्यांना ताण सहन करावा लागतो. काही कृषी सहाय्यकांकडे दहा ते १२ गावांचा पदभार आहे. अशा ओढाताणीमध्ये हे कर्मचारी कुठलेही काम व्यवस्थितपणे करू शकत नाहीत. तालुक्यातील शेतकऱ्यांची कामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी सातत्याने पळापळ होत असते.

विविध योजनेच्या लाभापासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागते. ज्या योजनेचा लाभ मिळतो तो घेण्यासाठी नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. यात अधिकारी, शेतकरी हतबल झाले आहेत. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी याकडे लक्ष द्यायला तयार नसल्याने आणखीच बिकट स्थिती बनली आहे.

Agriculture Department
Agriculture Department : तालुका कृषी अधिकारी दर्जाची ६६ जणांना पदोन्नती

रिक्त पदांचा तपशिल

तालुका कृषी अधिकारी एक

कृषी अधिकारी एक

कृषी सहाय्यक १२

अनुरेखक ४

लिपिक १

वाहनचालक १

शिपाई ३

चौकीदार १

बाळापूर तालुक्यात कृषी, महसूल विभागात रिक्त पदांचा मोठा अनुशेष आहे. महसूल विभागात तर दलालांची चलती आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्याकडे सातत्याने दुर्लक्ष आहे.
- गोपाल अंबादास पोहरे, उरळ, ता. बाळापूर, जि. अकोला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com