Heavy Rainfall : परतीच्या पावसामुळे गाळप वेळापत्रक विस्कळित

राज्यातील साखर कारखान्यांना यंदाच्या गाळपासाठी परवाने देण्यात आलेले आहेत. मात्र, आतापर्यंत यातील १६ केवळ कारखान्यांची धुराडी पेटली आहेत.
Sugar Mills
Sugar MillsAgrowon
Published on: 
Updated on: 

पुणे ः राज्यातील साखर कारखान्यांना (Sugar Mill) यंदाच्या गाळपासाठी परवाने देण्यात आलेले आहेत. मात्र, आतापर्यंत यातील १६ केवळ कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. अवकाळी पावसामुळे (Heavy Rainfall) ऊसतोडीचे वेळापत्रक विस्कळित होत असल्याची माहिती साखर आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.

गेल्या हंगामात देशातील सर्वात जास्त साखर उत्पादन महाराष्ट्राने केले होते. १४.८८ लाख हेक्टर क्षेत्रावरील ऊस गाळपाचे मोठे आव्हान राज्यातील साखर कारखान्यांनी पार पाडले. गेल्या हंगामात २०० साखर कारखान्यांनी एकूण गाळप १३२२ लाख टन ऊस गाळला होता. यंदा गाळप १३०० लाख टनाच्या पुढे राहील, असा अंदाज आयुक्तालयाचा आहे.

Sugar Mills
Crop Damage : नुकसानीचे क्षेत्र २० हजार हेक्टरवर जाण्याचा धोका

“राज्यभर चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे उसाचे भरणपोषण चांगले झाले आहे. आमच्या अपेक्षेप्रमाणे हेक्टरी ९५ टन ऊस उत्पादन झाल्यास एकूण गाळप १४४३ लाख टनाच्या आसपास राहू शकेल. अंदाजाप्रमाणे गाळपाला वेळेत ऊस मिळाल्यास १३८ लाख टन साखर तयार होऊ शकते. मात्र, इथेनॉलकडे १० ते १२ लाख टन साखर वळवली जाणार आहे. त्यामुळे एकूण साखर उत्पादन आमच्या अंदाजाप्रमाणे १५० लाख टनाच्या आसपास होऊ शकते,” असे साखर उद्योगाचे म्हणणे आहे.

२०३ कारखाने सुरू होण्याची शक्यता

“साखर आयुक्तालयाच्या अंदाजाप्रमाणे चालू हंगामात २०३ साखर कारखाने चालू होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत गाळप परवाने मात्र ९७ कारखान्यांना देण्यात आले आहेत. यंदा दिवाळीपर्यंत सुरू झालेल्या कारखान्यांची संख्या १६ आहे. त्यात सहकारी ८ व खासगी ८ कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांनी ९० हजार टन ऊस गाळला आहे. ३८ हजार क्विंटल साखर तयार केली आहे. साखर उतारा ४.२२ टक्के इतका नीचांकी मिळतो आहे,” असे सूत्रांनी स्पष्ट केले.

“अवकाळी पावसामुळे ऊसतोड आणि वाहतुकीत अडथळे येत आहेत. त्यामुळे काही कारखान्यांचे वेळापत्रक बदलले आहे. मात्र, राज्यातील एकूण उसाची उपलब्धता विचारात घेता एकूण गाळप गेल्या हंगामा इतकेच राहण्याची शक्यता आहे.”

- पांडुरंग शेळके, सहसंचालक, विकास शाखा, साखर आयुक्तालय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com