Tambadi Dam : ‘तांबडी’मुळे सिंचनाचा प्रश्‍न मार्गी

MP Sunil Tatkare : भविष्यात रोजगाराचे साधना उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्‍यासाठी पायाभूत सुविधांवर भर दिला जात असून यातून पर्यटनाला चालना मिळेल, तसेच स्‍थानिकांना रोजगार उपलब्‍ध होईल, असे आश्‍वासन खासदार सुनील तटकरे यांनी दिले आहे.
Sunil Tatkare
Sunil TatkareAgrowon

Mumbai News : तालुक्यातील डोंगर भागात असलेल्या तांबडी धरणाला १९९६ मध्‍ये मान्यता मिळाली होती‌. परंतु वन जमिनीमुळे हा प्रकल्पाचे काम प्रलंबित राहिले आहे. प्रकल्पासाठी जवळपास ३५ एकर जमीन संपादन होणार आहे. धरणामुळे तांबडी परिसरातील गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. शिवाय सिंचनासाठीही वापर होणार आहे.

तालुक्‍यात फलोत्पादन, कृषी पर्यटनाच्या दृष्‍टीने नवनवीन प्रयोग केले जात आहेत. त्‍यामुळे भविष्यात रोजगाराचे साधना उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्‍यासाठी पायाभूत सुविधांवर भर दिला जात असून यातून पर्यटनाला चालना मिळेल, तसेच स्‍थानिकांना रोजगार उपलब्‍ध होईल, असे आश्‍वासन खासदार सुनील तटकरे यांनी दिले आहे.

Sunil Tatkare
Agriculture Irrigation Scheme : परभणी जिल्ह्यातील लाभार्थींना ३८ लाखांवर अनुदान वितरित

महाराष्ट्र सरकार मृदा व जलसंधारण विभागाच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या तांबडी लघुपाटबंधारे योजनेचे भूमीपूजनप्रसंगी तटकरे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सुरेश मगर, तालुका अध्यक्ष विनोद पाशिलकर, माजी उपसभापती रामचंद्र सकपाळ, जगन्नाथ कुंडे, किसन मोरे, सरपंच उद्देश देवघरकर, नवनीत डोलकर, किरण मोरे, हरेश नायणेकर, सरपंच परशुराम पवार आदी उपस्थित होते.

Sunil Tatkare
Agriculture Irrigation : शेतीसाठी पाणी हवे तर आधी पाणीपट्टी भरा

लघुपाटबंधारे योजनेअंतर्गत आधीच सर्वेक्षण झाले आहे. या प्रकल्पासाठी १० कोटींचा निधी उपलब्ध असून भूसंपादनासाठी आणखी १५ कोटींची आवश्यक आहे. संबंधित सर्व बाबींची पूर्तता झाल्यानंतर धरणाचे काम सुरू होईल, अशी माहिती जलसंधारण विभागाचे उपअभियंता अण्णा कदम यांनी दिली. तांबडी धरणास कालवाही प्रस्‍तावित आहे. त्‍यामुळे परिसरातील गावे, शेतकऱ्यांना फायदा होऊन सिंचनाखालील क्षेत्र वाढण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

असे असणार तांबडी धरण

तांबडी लघुपाटबंधारे योजना असे प्रकल्पाचे नाव असून धरणाची लांबी २९०.०० मीटर तर उंची ३०.५९ मीटर आहे. धरण क्षेत्रात १५७६ स.घ.मी. साठा उपलब्ध होणार आहे. धरणामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार असून १४४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. यातून उजवा कालवा ४.२५ किमीचा असेल. बंधाऱ्याचा लाभ परिसरातील तांबडी, घोसाळे, कवळठे आदी गावांना होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com