Milk Rate : दूध दरातील घसरणीमुळे पशुपालक हवालदिल

Milk Rate Issue : दुध दरातील घसरणीच्या परिणामी पशुपालकांना हा व्यवसाय करणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे दूध दरात वाढ करावी, अशी मागणी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
Milk Rate
Milk RateAgrowon
Published on
Updated on

Bhandara News : शेतीपूरक व्यवसाय म्हणून जिल्ह्यात दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पूर्व विदर्भात सर्वाधिक दुग्ध उत्पादनासाठी देखील भंडारा जिल्हा ओळखला जातो. मात्र दरातील घसरणीच्या परिणामी पशुपालकांना हा व्यवसाय करणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे दूध दरात वाढ करावी, अशी मागणी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

पूर्व विदर्भातील भंडारा जिल्हा हा धानाचे कोठार म्हणून ओळखला जातो. मात्र या भागात एकाच पीकपद्धतीवर शेतकऱ्यांची अवलंबिता असल्याने नैसर्गिक आपत्तीच्या काळात त्यांना नुकसान सोसावे लागते. उत्पादकता खर्चाची भरपाई देखील होत नाही, अशी स्थिती राहते.

Milk Rate
Milk Rate : दूध दरवाढीसाठी पुणे जिल्ह्यात आंदोलने

ही जोखीम कमी करण्यासाठी म्हणून शेतकऱ्यांव्दारे पूरक व्यवसाय केला जातो. त्यामध्ये दुग्ध व्यवसाय अग्रस्थानी आहे. त्यामुळेच दूध संकलनात देखील जिल्ह्याने पूर्व विदर्भात आघाडी मिळविली आहे.

दूध विक्रीच्या रक्‍कमेतून दैनंदिन गरजांच्या पूर्ततेसाठी पैशाची सोय करणे शेतकऱ्यांना शक्‍य होते. सध्या मात्र पशुखाद्यात सातत्याने वाढ होत असल्याने हा व्यवसाय करणे जिकरीचे ठरत आहे. दुधाळ जनावरांच्या आहारावर विशेष लक्ष द्यावे लागते. त्यामध्ये मिनरल मिक्‍श्चर तसेच इतर पौष्टिक घटकांचा समावेश असलेल्या खाद्यान्नाचा समावेश राहतो.

Milk Rate
Milk Rate Protest : दूध उत्पादकांचे गांधीगिरी पद्धतीने आंदोलन

याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे पशुपालन करुन दुग्ध व्यवसायात सातत्य राखणे अडचणीचे ठरत आहे. पशुखाद्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत असली तरी दुसरीकडे दुधाचे दर मात्र दबावात ठेवले जात आहेत. शासनाकडून हमीभावाचा आदेश काढण्यात आला असला तरी त्यांच्या अंमलबजावणीसाठी कोणत्याच यंत्रणेकडून कोणत्याच स्तरावर पुढाकार घेण्याचे प्रयत्न होताना दिसत नाहीत.

परिणामी येत्या काळात शेतकरी या व्यवसायापासून दूर जाण्याची भिती आहे. या विषयात शासनाने तत्काळ हस्तक्षेप करीत पशुपालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सुहास गजभिये, यशवंत भोयर, अजय मेश्राम, नीलेश मारवाडे यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com