हवामान अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांचेकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार कोकण विभागामध्ये २१ डिसेंबर तारखेपर्यंत तापमान कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअस आणि किमान २१-२२ अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. या काळात सकाळची सापेक्ष आर्द्रता ५१-५८%, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३९-४८% असेल. वाऱ्याचा वेग ७-१० किमी प्रती तास या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. उद्या २० डिसेंबरला कोकणातील काही ठिकाणी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे, तर २१ डिसेंबर रोजी आकाश पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता दिसत आहे..विस्तारित श्रेणी अंदाजानुसार (ईआरएफएस) कोकण विभागात १९ ते २५ डिसेंबर पावसाची कोणतीही शक्यता दिसत नाही. या कालावधीमध्ये उत्तर कोकण विभागात कमाल तापमान सरासरी एवढे आणि दक्षिण कोकण विभागात सरासरी एवढे किंवा त्यापेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. तर किमान तापमान बहुतांश ठिकाणी सरासरी एवढे राहील. दक्षिण कोकण विभागात तापमान सरासरीएवढे राहू शकते..Crop Advisory: कृषी सल्ला (कोकण विभाग).मोहरीपूर्वमशागत आणि पेरणीमोहरी पिकाच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. भात कापणीनंतर जमीन वाफसा स्थितीत आल्यावर जमीन नांगरणी करून ढेकळे फोडून जमीन सपाट करावी. नांगरणीच्या वेळेस प्रति गुंठा ५० किलो चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट मातीत मिसळावे. बियाण्याची पेरणी ४५ × १० से. मी. अंतरावर २ ते ३ सें. मी. खोलीवर करावी.पेरणीपूर्वी बियाण्यास ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम किंवा कॅप्टन ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात प्रक्रिया करावी.पेरणीच्या वेळी ओळीमध्ये प्रति गुंठा १ किलो युरिया आणि ३ किलो सिंगल सुपर फॉस्फेट खताची मात्रा द्यावी. पेरणीनंतर हलके पाणी द्यावे.मोहरीची पेरणी करून १० ते १२ दिवस झाले असल्यास विरळणी करून घ्यावी.२० दिवसांनी एक कोळपणी करावी..मधुमकावाढीची अवस्थामधुमक्याचे पीक उगवून आल्यानंतर १० ते १२ दिवसांनी विरळणी करावी. प्रत्येक ठिकाणी जोमदार असे एकच रोप ठेवावे.पेरणीनंतर २० दिवसांनी बेणणी करून पीक तणमुक्त ठेवावे.मधुमका पिकास १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पाणी दिल्यानंतर शेतात जास्त वेळ पाणी साचू देऊ नये, याची काळजी घ्यावी.मधुमका पिकाची पेरणी होऊन एक महिना झाला असल्यास, प्रति गुंठा १.१ किलो युरिया खताची मात्रा पिकास द्यावी..Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग.वालवाढीची अवस्थावाल पीक उगवून आल्यानंतर प्रति गुंठ्याला ५० किलो गिरिपुष्प, गवते किंवा अन्य सुक्या पाल्याचे आच्छादन केल्यास तणांचा उपद्रव अत्यंत कमी प्रमाणात होतो. आंतरमशागत करावी लागत नाही. जमिनीतील ओलावा जास्त दिवस टिकून राहतो.वालातील तणांचे नियंत्रण करण्यासाठी पेरणीनंतर १५ दिवसांनी बेणणी करावी.हवामान आर्द्र असल्यामुळे वाल पिकामध्ये रस शोषक किडीच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे. प्रादुर्भाव दिसून आल्यास लॅम्बडा सायहॅलोथ्रिन (५ टक्के ई.सी.) ६ मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी..कुळीथ/ चवळीवाढीची अवस्थाकुळीथ व चवळी पिकामध्ये पेरणीनंतर एक वेळ कोळपणी १५ ते २० दिवसांनी व आवश्यकतेनुसार ३०-४० दिवसांनी बेणणी करावी. त्यानंतर पिकाची वाढ दाट झाल्यामुळे तणांच्या वाढीस आळा बसतो.चवळी पिकाला ८ ते ९ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.हवामान आर्द्र असल्यामुळे रस शोषक किडीच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे. प्रादुर्भाव दिसून आल्यास लॅम्बडा सायहॅलोथ्रिन (५ टक्के ई.सी.) ६ मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी..मिरचीवाढीची अवस्थासध्या कोरडे व आर्द्र हवामान असल्यामुळे मिरची पिकावर फुलकिडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. फुलकिडीचा प्रादुर्भाव आढळल्यास डायमेथोएट (३० टक्के ईसी) १ मि.लि. किंवा फिप्रोनिल (५ टक्के एससी) १ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.