Drought Affected Students : दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा, १० वी आणि १२वीच्या परिक्षा फी मिळणार परत

Kolhapur Drought : कोल्हापूर विभागांतर्गत असलेल्या सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतून नोंदणी केलेल्या एक लाख १६ हजार ९४७ विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
Drought Affected Students
Drought Affected Studentsagrowon

Exam Fee Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त भागातील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार कोल्हापूर विभागांतर्गत असलेल्या सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतून नोंदणी केलेल्या एक लाख १६ हजार ९४७ विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. त्यांच्या शुल्काच्या प्रतिपूर्तीची रक्कम पाच कोटी ८४ लाख ७३ हजार ५०० रुपये इतकी होते.

सन २०२३ मध्ये शासनाच्या महसूल आणि वनविभागाने दुष्काळग्रस्त तालुके घोषित केले आहेत. या तालुक्यांमधील राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी, बारावीतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ आणि परीक्षा शुल्काची प्रतिपूर्तीची योजना सुरू केली.

त्यानुसार कोल्हापूर विभागाअंतर्गत असलेल्या तीन जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त भागामधील एकूण १६८६ शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतील एक लाख १६ हजार ९४७ विद्यार्थ्यांनी या शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी शिक्षण मंडळाकडे नोंदणी केली आहे. दरम्यान, राज्यातील दुष्काळग्रस्त भागामधील सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती करण्यासाठी एकूण ३२ कोटी ७ लाख ८७ हजार ४७५ रुपये लागणार आहेत. त्यापैकी ८ कोटी ३० लाख रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी सरकारने मान्यता दिली आहे.

कोल्हापूर विभागातून शुल्क प्रतिपूर्तीसाठी नोंदणी केलेल्या विद्याथ्यांची संख्येनुसार दहावीच्या शुल्काच्या प्रतिपूर्तीची रक्कम तीन कोटी ३९ लाख एक हजार रुपये, तर बारावीची रक्कम दोन कोटी ४४ लाख ८२ हजार ५०० रुपये इतकी होते.

Drought Affected Students
Kolhapur Water Shortage : कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या तालुक्याला पाणी टंचाईची शक्यता

तर, संबंधित विभागातून प्रतिपूर्ती

'या शुल्क प्रतिपूर्तीसाठी विद्यार्थ्यांनी नोंदणी आणि त्यांच्या मुख्याध्यापक, प्राचार्यांनी त्याला ऑनलाईन मान्यता देणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांना शासनाच्या इतर विभागांकडून सवलती मिळतात, त्यांनी प्रतिपूर्तीसाठी नोंदणी केली असल्यास त्यांच्या या सवलती रद्द होतील आणि त्यांना सवलती देणाऱ्या संबंधित विभागाकडून शुल्काची प्रतिपूर्ती मिळणार असल्याचे शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागाचे सहसचिव डी. एस. पोवार यांनी सांगितले.

परीक्षा शुल्क असे

दहावी प्रतिविद्यार्थी ५०० रुपये बारावी प्रतिविद्यार्थी ५०० ते ५६० रुपये (विषयवार शुल्क) उद्यापर्यंत नोंदणीची मुदत या परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीचा लाभ मिळण्यासाठी पात्रतेच्या आवश्यक माहितीसह स्वतः आणि पालकांच्या आधार संलग्न बैंक खात्याच्या माहितीसह नियमित विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधावा. या प्रतिपूर्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्याची अंतिम मुदत बुधवार (ता. २४) पर्यंत असल्याची माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागाचे सचिव सुभाष चौगले यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com