हेमंत जगतापAgri Technology: शेडनेट हाउसमध्ये पिकांच्या जोमदार वाढीसाठी आणि पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी ठिबक सिंचन ही अत्यंत प्रभावी पद्धत आहे. शेडनेटमधील नियंत्रित वातावरणात आर्द्रता आणि जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी या प्रणालीचे नियोजन करणे महत्त्वाचे ठरते..शेडनेट हाउसमध्ये पिकांना नियंत्रित व अचूक पाणीपुरवठा करण्यासाठी ठिबक सिंचन पद्धत वापरली जाते. ही प्रणाली थेट झाडाच्या मुळांजवळ पाणी देते, त्यामुळे पाण्याची बचत व उत्पादन वाढ होते..Irrigation techniques: सिंचनासाठी क्षारयुक्त पाणी वापरताना काय काळजी घ्याल?.मुख्य घटक पाण्याचा स्रोतशेडनेट हाउससाठी पाण्याचा स्रोत निवडताना केवळ पाण्याची उपलब्धता असून चालत नाही, तर त्या पाण्याची गुणवत्ता आणि शाश्वतता अत्यंत महत्त्वाची असते. शेडनेटमध्ये पिके नियंत्रित वातावरणात असतात, त्यामुळे पाण्याचा दर्जा उत्पादनावर थेट परिणाम करतो..उपलब्ध जलस्त्रोतविहीर किंवा कूपनलिका ः हा ग्रामीण भागातील सर्वात सामान्य स्रोत आहे. मात्र, कूपनलिकेच्या पाण्याचा सामू आणि क्षारता तपासणे आवश्यक असते.शेततळे : पावसाचे पाणी साठवण्यासाठी शेततळे हा सर्वोत्तम पर्याय आहे. हे पाणी नैसर्गिकरीत्या मृदू असते, जे ठिबक सिंचन आणि फॉगर्ससाठी उत्तम ठरते.नदी किंवा कालवा : जर जवळ नदी असेल, तर पाण्याचा उपसा करून ते साठवण तलावात घेऊन मगच शेडनेटमधील पिकांना वापरावे. यामुळे गढूळपणा कमी होतो..पाण्याचे गुणधर्म आणि चाचणीशेडनेटमधील सिंचनासाठी पाणी वापरण्यापूर्वी प्रयोगशाळेत तपासणी करून घेणे गरजेचे आहे. आदर्श मानके खालीलप्रमाणे आहेत.सामू : ६.५ ते ७.५ च्या दरम्यान असावा. जास्त सामू असल्यास खतांची उपलब्धता कमी होते.विद्युत वाहकता : ०.५ ते १.५ dS/m च्या दरम्यान असावी. क्षारयुक्त पाणी पिकांच्या मुळांना इजा करू शकते.क्षारता : ५०० पीपीएम पेक्षा कमी असल्यास ते उत्तम मानले जाते..पाण्याची साठवणूक शेडनेटच्या बाजूला एक काँक्रीटची टाकी किंवा प्लॅस्टिकची मोठी टाकी असावी. यामुळे पाण्यातील कचरा खाली बसतो.पाण्याचे तापमान वातावरणाशी जुळवून घेते, ज्यामुळे पिकांना ताण बसत नाही. विद्युत पुरवठा खंडित झाल्यास किंवा पंपाचा बिघाड झाल्यास आपत्कालीन साठा उपलब्ध राहतो. पाण्याचा स्रोत, उपकरणांचे आयुष्य क्षारयुक्त पाणी : जर पाण्याचा स्रोत क्षारयुक्त असेल, तर ठिबक सिंचनाच्या नळ्या आणि फॉगर्सचे नोजल वारंवार चोकअप होतात. अशा वेळी ‘वॉटर सॉफ्टनर’ वापरणे फायदेशीर ठरते. गढूळ पाणी : नदी किंवा कालव्याचे पाणी वापरताना सँड फिल्टर वापरणे अनिवार्य आहे..महत्त्वाचे मुद्दे रेन वॉटर हार्वेस्टिंग: शेडनेटच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी पाईपद्वारे गोळा करून शेततळ्यात साठवता येते. हे पाणी पिकांसाठी उपयुक्त ठरते. पाणी उपसा क्षमता: पिकाच्या गरजेनुसार (पीक ऐन भरात असताना आणि कडक उन्हाळ्यात) दररोज लागणाऱ्या पाण्याची गणना करूनच पंपाची आणि स्रोताची निवड करावी..फिल्टर युनिटशेडनेट हाउसमध्ये ठिबक सिंचन आणि फॉगर्सची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी फिल्टर युनिट हा प्रणालीचा महत्त्वाचा भाग आहे. सिंचनाच्या पाण्यातून येणारी वाळू, कचरा, शेवाळ आणि इतर अशुद्धी रोखून ड्रिपर्स चोकअप होण्यापासून वाचवणे हे याचे मुख्य काम आहे..शेडनेटसाठी आवश्यक मुख्य फिल्टरसँड किंवा ग्रॅव्हल फिल्टरजर तुम्ही नदी, कालवा किंवा उघड्या शेततळ्यातील पाणी वापरत असाल, तर हे फिल्टर अत्यंत आवश्यक आहे.कार्य : यामध्ये विशेष प्रकारची वाळू (Basalt Sand) वापरली जाते, जी पाण्यातील शेवाळ, कचरा आणि सेंद्रिय घटक अडवून धरते.उपयोग : पाण्याचा प्राथमिक स्रोत अस्वच्छ असेल तर हे पहिले फिल्टर म्हणून वापरले जाते..स्क्रीन फिल्टरहे फिल्टर प्रामुख्याने विहीर किंवा कूपनलिकेच्या पाण्यासाठी वापरले जाते, जिथे कचरा कमी असतो.कार्य : यामध्ये स्टेनलेस स्टील किंवा प्लॅस्टिकची एक जाळी असते. ही जाळी बारीक वाळू आणि कचरा अडवते.मर्यादा : जर पाण्यात शेवाळ जास्त असेल, तर स्क्रीन फिल्टर वारंवार स्वच्छ करावा लागतो..डिस्क फिल्टरशेडनेट हाउससाठी हे सर्वात लोकप्रिय आणि कार्यक्षम फिल्टर मानले जाते.कार्य : यामध्ये एकावर एक रचलेल्या अनेक चकत्या असतात. या चकत्यांच्या खाचांमधून पाणी जाताना अतिसूक्ष्म कचराही अडवला जातो.फायदा : हे फिल्टर साफ करणे सोपे असते आणि ते स्क्रीन फिल्टरपेक्षा जास्त कचरा साठवू शकते. .हायड्रोसायक्लोन फिल्टरजर बोअरवेलच्या पाण्यातून बारीक रेती किंवा वाळू येत असेल, तर हे फिल्टर वापरले जाते.कार्य : हे फिल्टर पाण्याला गोलाकार फिरवते, ज्यामुळे जड रेतीचे कण खाली बसतात, स्वच्छ पाणी पुढे जाते..फिल्टर युनिटची मांडणीशेडनेटसाठी फिल्टर युनिट बसवताना साधारणपणे खालील क्रम राखला जातो:पंप २. हायड्रोसायक्लोन / सँड फिल्टर (पाणी जास्त खराब असल्यास) ३. फर्टिगेशन टँक / व्हेंचुरी (खते देण्यासाठी) ४. डिस्क किंवा स्क्रीन फिल्टर (अंतिम शुद्धीकरणासाठी) ५. मेन लाईन. .Hydroponic System: वनामकृवित आयओटी आधारित स्मार्ट हायड्रोपोनिक प्रणाली कार्यान्वित.फिल्टरची देखभालबॅक वॉशिंग : सँड फिल्टरमधील कचरा साफ करण्यासाठी पाण्याचा प्रवाह उलटा फिरवून कचरा बाहेर काढावा.प्रेशर गेज तपासणी : फिल्टरच्या आधी आणि नंतर असलेल्या प्रेशर गेजमध्ये जर ०.५ kg/cm² पेक्षा जास्त फरक दिसत असेल, तर समजावे, की फिल्टर साफ करण्याची वेळ आली आहे.नियमित स्वच्छता : आठवड्यातून किमान दोनदा डिस्क किंवा स्क्रीन काढून ती हाताने किंवा मऊ ब्रशने स्वच्छ करावी..मुख्य पाइपशेडनेट हाउसच्या सिंचन प्रणालीमध्ये मुख्य पाईप हा संपूर्ण संरचनेचा कणा असतो. पंप संचापासून आलेले पाणी उप-मुख्य लाईन आणि नंतर लॅटरलपर्यंत पोहोचवण्याचे काम मुख्य पाईप करतो. शेडनेटसाठी मुख्य पाईपची निवड आणि मांडणी करताना तांत्रिक बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे..पाईपचा प्रकार आणि साहित्यशेडनेटमध्ये सामान्यतः पीव्हीसी किंवा एचडीपीई पाईप्सचा वापर केला जातो.पीव्हीसी पाईप: हे स्वस्त आणि बसवण्यास सोपे असतात. शेडनेटच्या आत जमिनीखाली गाडण्यासाठी हे उत्तम आहेत.एचडीपीई पाईप: हे अधिक लवचिक आणि टिकाऊ असतात. जर जमीन चढ-उताराची असेल, तर हे पाईप जास्त सोयीचे ठरतात..पाईपचा व्यासमुख्य पाईपचा आकार हा तुमच्या शेडनेटच्या क्षेत्रावर आणि लागणाऱ्या पाण्याच्या दाबावर अवलंबून असतो.लहान शेडनेट (१० ते २० गुंठे): २.५ इंच (७५ मिमि) किंवा ३ इंच (९० मिमि) व्यासाचा पाईप पुरेसा असतो.मोठे शेडनेट (४० गुंठे किंवा जास्त): किमान ३ ते ४ इंच (९० मिमि ते ११० मिमि) व्यासाचा पाईप वापरावा लागतो जेणेकरून पाण्याचा दाब शेवटपर्यंत सारखा राहील..दाबाची क्षमताशेडनेटमध्ये फर्टिगेशन आणि फॉगर्स चालवण्यासाठी पाण्याचा दाब जास्त लागतो. त्यामुळे मुख्य पाईप निवडताना तो किमान ४ kg/cm² ते ६ kg/cm² दाब सहन करणारा असावा (Class २ किंवा Class ३ PVC)..मुख्य पाईपशी जोडले जाणारे घटकमुख्य पाईपमधून केवळ पाणी वाहत नाही, तर त्यावर खालील महत्त्वाचे संच बसवलेले असतात.बायपास यंत्रणा: पाण्याचा अतिरिक्त दाब कमी करण्यासाठी.फिल्टर युनिट जोडणी: स्वच्छ पाण्यासाठी.व्हेंचुरी जोडणी: खते देण्यासाठी मुख्य पाईपला जोड दिली जाते..मुख्य पाईपची मांडणीखोली: मुख्य पाईप जमिनीच्या पृष्ठभागापासून किमान १.५ ते २ फूट खोलीवर गाडावा. यामुळे शेडनेटमधील मशागतीवेळी (उदा. पॉवर टिलर चालवताना) पाईपला इजा होत नाही.कंट्रोल व्हॉल्व्ह : मुख्य पाईपवर प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र व्हॉल्व्ह असावेत. यामुळे तुम्ही गरजेनुसार एका वेळी एकाच भागाला पाणी देऊ शकता.एअर व्हॉल्व्ह ः मुख्य पाईपच्या सुरुवातीला किंवा उंचावर एअर व्हॉल्व्ह बसवणे गरजेचे आहे. यामुळे पाईपमधील हवा निघून जाते आणि ‘वॉटर हॅमर’मुळे पाईप फुटण्याचा धोका टळतो.नॉन-रिटर्न व्हॉल्व्ह : पंपाजवळ नॉन-रिटर्न व्हॉल्व्ह बसवावा, जेणेकरून वीज गेल्यावर पाणी पुन्हा पंपाकडे जाऊन पाईपमध्ये व्हॅक्युम तयार होणार नाही..देखभालपाईपलाईनमध्ये कुठेही गळती नाही ना, याची वेळोवेळी तपासणी करावी.कडक उन्हाळ्यात जर पाईप उघड्यावर असतील, तर ते झाकून ठेवावेत किंवा काळे पेंट करावेत जेणेकरून अतिनील किरणांमुळे ते ठिसूळ होणार नाहीत. - हेमंत जगताप ८२७५३७१०८२(वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे) .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.