Urea Shortage : युरियाची कृत्रीम टंचाई खानदेशात प्रशासनाची भूमिकेबाबत साशंकता

Shortage Of Urea : जुलै महिन्यात युरिया खताचा‎ तुटवडा निर्माण झाला आहे. कृषी‎ दुकानामध्ये युरिया मिळत‎ नसल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाले‎ आहेत.
Urea shortage
Urea shortage Agrowon

Jalgaon News : खानदेशात युरियाची कृत्रीम टंचाई कायम आहे. जळगाव जिल्हा प्रशासनाने मोठा युरियाचा साठा जिल्ह्यात दिसत असल्याचे म्हटले आहे, पण युरिया शेतकऱ्यांना दिला जात नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबतही साशंकता आहे.

जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या सभेतही युरियाची टंचाई व इतर विषय गाजले. यात पालकमंत्र्यांनी युरियाची टंचाई का आहे, अशी विचारणा करून चौकशी करा व दोषी कृषिकेंद्र चालकांचे परवाने निलंबित करा, असे निर्देश दिले.

Urea shortage
Urea Racket : युरियाचा काळाबाजारः २० लाखांचा युरिया जप्त, मुंबई रॅकेट असल्याची चर्चा

शेतकरी वारंवार या समस्येबाबत सुरुवातीपासून तक्रारी करीत आहेत. परंतु दखल घेतली जात नाही. मागील दोन - तीन दिवस पावसाळी वातावरण तयार झाल्याने कोरडवाहू व इतर पिकांना खते देण्याचे कामही हाती घेण्यात आले. पण शेतकऱ्यांना युरियाच मिळत नसल्याची स्थिती आहे.

Urea shortage
Devendra Fadnavis : युरिया सबसिडी, एफआरपी वाढीचा शेतकऱ्यांना फायदा ः फडणवीस

खानदेशात मागील तीन दिवसांत युरियाचा पुरवठा झालेला नाही. पुरवठ्याची टक्केवारीही कमी आहे. या महिन्यात निर्देशित पुरवठ्याच्या तुलनेत २० टक्केही पुरवठा झालेला नाही. खानदेशात पावणेतीन लाख टन युरियाची आवश्यकता खरिपात असते. पण सुरुवातीपासून अपेक्षित पुरवठा नाही. निर्देशित लक्ष्यांकाच्या तुलनेत ५० टक्केही पुरवठा झालेला नाही.

जळगाव जिल्ह्यात पावणेदोन लाख टन युरियाची गरज आहे. परंतु हा पुरवठा विस्कळीत आहे. दर तीन-चार दिवसांत पाच हजार टनांपेक्षा अधिक युरियाची गरज असते. पाऊस नसल्यास ही गरज कमी होते. खतांची अधिकची मागणी पाऊस आल्यानंतरचे दोन महिने अधिक असते. यंदा जुलैत पाऊस आला. यामुळे पूर्वहंगामी कापूस उत्पादक व इतर पिकांचे उत्पादकही युरियाची मागणी करीत आहेत.

जळगाव जिल्ह्यात खत विक्रेत्यांकडे मोठा युरियाचा साठा असल्याचे सांगितले जाते. तरीही शेतकऱ्यांना खते का मिळत नाहीत, असा प्रश्‍न आहे. जळगाव, चोपडा, पाचोरा, रावेर, यावल, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, अमळनेर, पारोळा, धुळ्यातील शिंदखेडा, धुळे, शिरपूर, नंदुरबारमध्ये नंदुरबार, शहादा, तळोदा, नवापूर, अक्कलकुवा आदी सर्वच भागांत युरियाचा तुटवडा आहे.

प्रशासन कुणाचा बचाव करतेय?

रब्बी हंगामातही काहीसा तुटवडा होता. पण रब्बीतही युरियाचा साठा आहे. त्याचा उपयोग खरिपात होईल, असे प्रशासनाने म्हटले होते. परंतु हा खतसाठा कुठे गेला, असा प्रश्‍न आहे. तपासणी, साठा फलक, विक्रीची नोंदणी याची सर्व माहिती समोर दिसते. परंतु कुठेही कारवाई केली जात नाही. कुणाचा बचाव प्रशासन करीत आहे? यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com