Sindhudurg ZP budget: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकात दुपटीने वाढ

जिल्हा परिषदेचे प्रशासक श्री. नायर यांनी सन २०२२-२३ चे सुधारित अंदाजपत्रक सादर केले.
Sindhudurg ZP
Sindhudurg ZPAgrowon

Sindhudurg Zilha Parishad : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या सन २०२२-२३ च्या अंदाजपत्रकात दुप्पटीने वाढ झाली असून सुधारित २४ कोटीचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. दरम्यान, सन २०२३-२४ करिता मूळ १७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक जिल्हा मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी सादर केले. गेल्या ३० वर्षांत प्रथमच प्रशासकाकडून अंदाजपत्रक मांडण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. नायर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

या बैठकीला अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, प्रकल्प संचालक उदय पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, शिवाय तनपुरे, वल्लरी गावडे, विलास आरोंदेकर, डॉ. महेश खलिपे, संतोष भोसले, विनायक ठाकूर आदी उपस्थित होते.

Sindhudurg ZP
Amravati ZP : अमरावती ‘झेडपी’च्या २५ कोटींच्या अर्थसंकल्पाला मान्यता

जिल्हा परिषदेचे प्रशासक श्री. नायर यांनी सन २०२२-२३ चे सुधारित अंदाजपत्रक सादर केले. सुधारित अंदाजपत्रकात अध्यक्ष-२ लाख ३८ हजार ८०० रुपये, सामान्य प्रशासन- १ कोटी ५१ लाख ९९ हजार रुपये, शिक्षण-२ कोटी १७ लाख ३७ हजार रुपये, बांधकाम ८ कोटी २३ लाख ५५ हजार ७५० रुपये, लघू पाटबंधारे ३६ लाख ४१ हजार १०० रुपये आहे.

आयुर्वेद-५ लाख रुपये, सार्वजनिक आरोग्य १ कोटी १५ लाख ९० हजार ३०० रुपये, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग-४३ लाख ४७ हजार ७०० रुपये, शेतीकरिता १ कोटी ४ लाख ८२ हजार ७०० रुपये, पशुसंवर्धन विभागासाठी १ कोटी २७ लाख ९८ हजार ४००, समाजकल्याणासाठी १ कोटी ३६ लाख ८२ हजार २०० आहेत.

जंगल २ लाख ८० हजार २००, महिला व बालकल्याण विभागाकरिता ७६ लाख ३१ हजार ३६० रुपये, संकीर्ण सामान्य प्रशासन, ग्रामपंचायत आणि वित्त विभाग २ कोटी ४३ लाख ५० हजार १९० रुपये, असे एकूण २० कोटी ८८ लाख ८६ हजार ३०० रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले. ३ कोटी ११ लाख १३ हजार ७०० रुपये शिल्लक राहणार आहेत.

तर, सन २०२३-२४ चे १७ कोटीचे अंदाजपत्रक देखील श्री. नायर यांनी सादर केले. या अंदाजपत्रकात भजनीमंडळांसाठी अनुदान, वणवेग्रस्तांना नुकसानभरपाई आणि मधुमेहींसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com