Rural News : आठवडी बाजार गावगाड्याला आधार देतो?

Seed Update : इथला सगळा व्यवहार मापट्यावर. बाजारकरी मापटं नकटं असे म्हणतात किलोच्या हिशेबाने थोडा आतबट्याचा व्यवहार. पण त्यांचे धान्य उत्पादनाती एकूण कौटुंबिक श्रम पारंपरिक बियाणे त्यांनी जतन करून ठेवलेले बाजारात येण्यासाठीचा प्रवास याचा विचार केला तर परवडते.
Market Update
Market UpdateAgrowon
Published on
Updated on

आनंद विंगकर

Rural Story : परवा मी ढेबेवाडीच्या बाजाराला भुईमुगाचे वेस्टर्न बियाणे आणायला गेलो होतो. हे बियाणे पारंपरिक पसऱ्या भुईमुगावर संकरीत केलेलं वाण असावे, चार महिन्यांचा कालावधी पुरवठ्याला उत्पादन बरे म्हणूनच पसंतीस उतरलेले.

ढेबेवाडी आमच्या भागातले कराडपासून ३०-३५ किलोमीटर लांब पश्चिमेला सह्याद्रीच्या पायथ्याला पाणलोटाच्या बदकालात बसलेले गाव. सळवे काळगाव उमरकांचन या तिन्ही खोऱ्यातील वसलेली अनेक गाव, वस्त्या-वाड्या शिवाय सह्याद्रीच्या पठारावरील गावांची ही सर्वात मोठी बाजारपेठ.

मंगळवारी असतो बाजार. सकाळी सातसाडेसातला सुरू होणारा संध्याकाळी पाचसाडेपाच सहा वाजता संपणारा. मी सर्व्हे केला नाही पण दिवसात दह पंधरा लाखांची उलाढाल होत असावी. दिवसभरात सात आठ हजार लोक येत जात असतील.

माणसाच्या प्राथमिक गरजेच्या सर्व गोष्टी मिळतात इथे. शेतकऱ्यांना अतिशय फायदेशीर ग्राहकांना किफायतशीर असा बाजार भरतो. देशीवाणाच्या तशाच संकरित सर्व भाज्या स्थानिक फळे डोंगरावरची बाजूच्या नदीतील मासे सुकी मच्छी समोर सोललेलं बकरं दुधजन्य वस्तू जसे की तूप या गोष्टी असतातच इथे.

हा जून जुलैचा महिना पेरणीचे दिवस, सगळी स्थानिक पारंपरिक बियाणे बायकांनी प्लास्टिकच्या पिशवीत गटुळ्यात बाचक्यात भरून आणलेली. देशी पावठ्याच्या अनेक तऱ्हा, उडिद काळ्या तोंडाचे बारीक चवळे, निळंकाळं बारीक मुग, काराळे दोडका वांगी किती नावे घ्यायची या सगळ्या दुर्मिळ जाती शेतकऱ्यांनी संरक्षित करुन ठेवलेली.

Market Update
Rural Story : ...अन् मळ्यात सुरेखा पुणेकरांनी खाल्ला पाडाचा आंबा

टरफलावर कुस असलेल्या मासाड भाताच्या जाती तीन. लाल काळा आणि पांढरा तब्येतीला दमदार अन चवीला चांगला लाल म्हासाड. उडदाची ओल्या चटणीची आमटी ताक भात दुधात हा लाल म्हासाड येवढा रुचकर की दिवसभरात दुसरे कोणतचं अन्न नको. जेवल्यासारखे वाटत नाही येवढा ताकदवान. यावेळी मला पांढरा मासाड तांदुळ मिळाले.

शेतकरीन म्हणाली हाय सेजारणी जवळ येणार असाल तर पुढच्या मंगळवारी आणते. राळे अन पंद्याचे तांदूळ तर मिळालेच. पण तीन चार किलो वरीचे तांदूळ तर काय पस्तीस रुपये किलो पडतो.

इथला सगळा व्यवहार मापट्यावर. बाजारकरी मापटं नकटं असे म्हणतात किलोच्या हिशेबाने थोडा आतबट्याचा व्यवहार. पण त्यांचे धान्य उत्पादनाती एकूण कौटुंबिक श्रम पारंपरिक बियाणे त्यांनी जतन करून ठेवलेले बाजारात येण्यासाठीचा प्रवास याचा विचार केला तर परवडते. डोंगरावरचा वासाचा बासमती म्हणून आणखी पाच किलो तांदूळ. आणि गावी घरी तयार केलेले सोयाबीनचे बियाणे घेतलं.

बाजार कार्पोरेट माँल संस्कृतीला पर्याय देणारी स्थानिक आर्थिक सामाजिक पारंपरिक व्यवस्था. जवळपास हजारभर विक्रते त्यांची कुटुंब. सात आठ हजार ग्राहक वाहतूक करणाऱ्या पाचशे बेकार तरुणांना काम, त्यांच्यावर अवलंबून असलेली कुटुंब या सर्वाना उदरनिर्वाहाचे साधन असतो बाजार.

शिवाय देशी वाणाचे संरक्षण त्याचा जेवणातील वापर त्यामुळे हा सगळा व्यवहार सामाजिक स्तरावरील निकोप आणि निरोगी. तसा आठवडी बाजार ग्रामीण आर्थिक व्यवहाराला बळकटी देणारा प्रकार. म्हणून तो मला अधिक आवडतो.

'दिव्य मराठी'साठी बाजार या विषयावर मी विहावे अशी सुनील कर्णिक यांची इच्छा होती. ते जमले नाही. तरीही वेगवेगळे बाजार मला सुटलेले नाहीत. तसे माडगूळकरांनी बाजार या संकल्पनेवर कथांचे पुस्तकच प्रकाशित केलेलं. महाराष्ट्र भर असे अनेक मोठे बाजार भरतात. त्यावर सुद्धा स्थानिक लेखकांनी लिहावे. इतकेच.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com