Supreme Court Order : शरद पवार यांचे फोटो, व्हिडिओ वापरू नका

Sharad Pawar Photos and Videos : शरद पवार यांचा फोटो आणि व्हिडिओ निवडणूक काळात कोठेही वापरू नका, तुम्ही स्वतंत्र पक्ष म्हणून लढा. तुम्ही तुमच्या पायावर उभे राहायला हवे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (ता. १३) अजित पवार गटाला दिले.
Supreme Court
Supreme CourtAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : शरद पवार यांचा फोटो आणि व्हिडिओ निवडणूक काळात कोठेही वापरू नका, तुम्ही स्वतंत्र पक्ष म्हणून लढा. तुम्ही तुमच्या पायावर उभे राहायला हवे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (ता. १३) अजित पवार गटाला दिले.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ हे चिन्ह न्यायप्रविष्ठ असल्याचे ठळक अक्षरांत प्रसिद्ध करावे, असे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानंतर अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियात शरद पवार यांच्या छायाचित्राचा समावेश असल्याची जाहिरात प्रसिद्ध केली. त्यानंतर शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Supreme Court
Political Manifesto : कर्जमाफी, भावांतर योजना राबवू

हा सर्वोच्च न्यालयालाचा अवमान असल्याचे सांगत अभिषेक मनू सिंघवी यांनी शरद पवार यांचा फोटो लावल्याचे निदर्शनास आणले. मिटकरी यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून व्हिडिओ प्रसारित करण्यात आला होता.

बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी शरद पवार यांचे फोटो आणि व्हिडिओ वापरू नका, असे तोंडी आदेश दिले आहेत. तसेच तुम्ही तुमच्या पायांवर उभे राहायला हवे. अजित पवार गटातील कुठल्याही सदस्याने शरद पवार यांचे फोटो आणि व्हिडिओ वापरू नयेत, असेही बजावले आहे.

Supreme Court
Maharashtra Politics : आमचा जाहीरनामा ‘जुमला’ नाही, तर आमची ‘गॅरेंटी’ : पवार

तर अशा प्रकारे फोटो आणि व्हिडिओ वापरल्याने निवडणुकीवर काही परिणाम होणार नाही, असा युक्तिवाद ज्येष्ठ वकील बलबीर सिंग यांनी न्यायालयासमोर केला. या वेळी न्या. सूर्यकांत आणि न्या. उज्ज्वल भुईया यांच्या खंडपीठाने सिंघवी यांना या जाहिरातीचा ग्रामीण भागातील लोकांवर प्रभाव पडेल का, अशी विचारणा केली असता,

सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत ३६ जागांवर अजित पवार आणि शरद पवार गटाच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होत आहे. त्यामुळे अजित पवार गटाचे अनेक सदस्य आपला शरद पवार यांच्याशी संबंध आहे हे दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत, असे सांगितले.

मिटकरींनी मागितली माफी

सर्वोच्च न्यायालयाने सुनावल्यानंतर अमोल मिटकरी यांनी माफी मागितली असून काही दिवसांपूर्वी माझ्या सोशल मीडिया टीमकडून एक व्हिडिओ ट्विट झाला. त्याचा अन्वयार्थ काढून आज सर्वोच्च न्यायालयासमोर वेगळ्या प्रकारे युक्तिवाद केला गेला. संबधित व्हिडिओ डीलिट करून मी अनाधानाने झालेल्या चुकीबद्दल न्यायलयाची माफी मागत असल्याचे प्रतिक्रियेत म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com