Naresh Tikait statement : महात्मा गांधींच्या नावाने चालणाऱ्या योजनेतून त्यांचे नाव काढणे चुकीचे आहे, असे म्हणत शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. मनरेगाच्या नाव बदलाच्या मुद्द्यावर सध्या देशभरात राजकारण तापले आहे. विरोधकांसोबत शेतकरी नेत्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहेत. .नरेश टिकैत यांनी माध्यमांशी संवाद साधत मनरेगाच्या नावबदलाचा विरोध केला आहे. “महात्मा गांधींच्या नावाने चालणारी योजना तशीच सुरू राहिली पाहिजे. सरकारने यात बदल करू नयेत.” अशी भूमिका टिकैत यांनी घेतली आहे..Rakesh Tikait: महाराष्ट्रातील एकाही शेतकऱ्याच्या जमिनीचा लिलाव होऊ देणार नाही .मनरेगाचे नाव बदलून आता ‘व्हीबी-जी राम जी’ करण्यात येणार आहे. या संदर्भातील विधेयकाला नुकतीच लोकसभेची मंजुरी मिळाली आहे. परंतु काँग्रेसने सरकारवर टीका करत गरीब आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करण्याची मागणी केली आहे. मनरेगा तसेच इतर योजनांमध्ये सुधारणा कराव्यात, असे काँग्रेसची मागणी आहे..ग्रामविकास मंत्र्यांचं प्रत्युत्तरलोकसभेत केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने मनरेगाला खऱ्या अर्थाने बळ दिले आहे, तर काँग्रेसने केवळ नावापुरती राजकारण केले. २०९९ च्या निवडणुकांच्या वेळी राजकीय फायद्यासाठी नरेगासोबत महात्मा गांधींचे नाव जोडले गेले, असा आरोपही त्यांनी केला. तसेच मोदी सरकारने ग्रामीण रोजगारासाठी १.५१ लाख कोटी रुपयांची आर्थिक तरतूद ठेवली आहे," असा दावाही चौहान यांनी केला..VB-G RAM G : अपयशाच्या स्मारकाचे नामांतर.व्हीबी-जी राम जी का?गांधीजींच्या मते गाव हेच भारताची आत्मा आहेत. गाव मजबूत झाले तर देश मजबूत होईल. या विधेयकामुळे गावांच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे. विधेयकाअंतर्गत ग्रामीण कुटुंबांना वर्षाला १२५ दिवसांपर्यंत मजुरीवर आधारित रोजगार देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे स्थलांतराला आळा बसेल आणि गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे स्पष्टीकरण लोकसभेत बोलताना केंद्रीय ग्रामविकास मंत्री चौहान यांनी दिले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.