Farmers Diwali : रत्नागिरीत शेतकऱ्यांची दिवाळी आता शेतावरच

Agriculture Work : दिवाळी तोंडावर आली असली तरीही शेतकरी आता दिवाळीपेक्षा शेतातील धान्य घरात आणण्याच्या कामात मग्न झाले आहेत.
Agriculture News
Agriculture News Agrowon
Published on
Updated on

Ratnagiri News : गेले १५ दिवस दुपारनंतर पडणाऱ्या पावसाने शेतकरी हैराण झाले होते. मात्र शनिवारपासून (ता. २६) पावसाने विश्रांती घेतल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात भातकापणी व झोडणीच्या कामाला वेग आला आहे.

दिवाळी तोंडावर आली असली तरीही शेतकरी आता दिवाळीपेक्षा शेतातील धान्य घरात आणण्याच्या कामात मग्न झाले आहेत. परिसरात ६० टक्के कापणी पूर्ण झाली आहे.

सुरुवातीपासून सप्टेंबरपर्यंत पावसाने सातत्य ठेवल्याने यावर्षी चांगले पीक तयार झाले होते. मात्र ऑक्टोबरमध्ये सुरू झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली. अनेक ठिकाणी हळवी भातशेती पावसामुळे आडवी झाल्याने नुकसान झाले.

Agriculture News
Paddy Harvesting : पावसाची उघडीप; भातपीक कापणीला वेग

आडव्या पडलेल्या भाताला पुन्हा कोंब आल्याने शेतकऱ्याने डोक्याला हात लावला होता. पाऊस विश्रांती घेत नसल्याने कापणीही करता येत नव्हती. दुपारपर्यंत कडकडीत ऊन आणि नंतर पाऊस यामुळे शेतकरी हतबल झाला होता.

दिवाळी तोंडावर आली तरी धान्य घरात येत नव्हते. कापलेले भात सुकवणे यातच शेतकऱ्यांचा वेळ जात होता. आता महान पीकही कापणीस तयार झाले आहे. गेले दोन दिवस पावसाने पूर्ण विश्रांती घेतल्यामुळे शेतकरी पूर्ण दिवस शेतातच आहे.

Agriculture News
Paddy Crop Damage : भात पीक नुकसान भरपाईसाठी जाचक अटी

सोमवारी (ता. २८) वसुबारसेपासून दिवाळी सुरू होते. मात्र दिवाळीपेक्षाही वर्षभराचे धान्य वेळेत घरी आणण्याची गडबड सुरू झाली आहे.

सकाळी भात कापल्यानंतर दुपारनंतर लगेच झोडले जात आहे. त्यासाठी शेतातच खळी तयार केली आहेत. हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे शेतकरी आता दिवाळी साजऱ्या करण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com