Akola News: गेले काही दिवस प्रतीक्षेत असलेल्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या बदल्या मंगळवारी (ता. २३) जाहीर करण्यात आल्या. या बदल्यांअंतर्गत पश्चिम विदर्भातील बुलडाणा व यवतमाळ जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांची परस्पर खांदेपालट करण्यात आली असून, अकोला जिल्ह्याच्या अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची नंदुरबार जिल्ह्यात नियुक्ती करण्यात आली आहे..बुलडाण्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांची यवतमाळ जिल्ह्यात याच पदावर बदली झाली. तर यवतमाळचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांची बुलडाणा जिल्ह्यात नियुक्ती करण्यात आली. अकोला जिल्ह्यात कार्यरत असलेले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांची नंदुरबार जिल्ह्यात बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी अद्याप कोणत्याही अधिकाऱ्याची नियुक्ती जाहीर झालेली नाही..Agriculture Officers Transfer Issues: ‘कृषी’च्या विनंती बदल्यांचे अधिकार मंत्रालयात घ्या: सहायक कृषी अधिकारी संघटना.अकोल्यात कार्यरत असताना श्री. किरवे यांनी मर्यादित मनुष्यबळ असूनही विभागाची कामकाजाची घडी बसवण्याचा प्रयत्न केला. पारंपरिक पिकांसोबतच फळपीक लागवडीस विशेष प्रोत्साहन दिले. केळी, संत्रा व इतर फळबागांच्या लागवडीत वाढ झाली असून, अनेक प्रलंबित प्रकरणे त्यांनी मार्गी लावण्याचेही प्रयत्न केले. मात्र त्यांच्या बदलीनंतर अकोल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचे रिक्त पद ही बाब शेतकऱ्यांच्या दृष्टीने चिंतेची आहे. त्यामुळे लवकर नवीन अधिकाऱ्याच्या नियुक्तीची अपेक्षा व्यक्त होत आहे. .Agriculture Officer Transfer Issue: बदलीनंतरही रुजू न झालेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई नाही .बुलडाण्यात कार्यरत असताना श्री. ढगे यांनी कृषीच्या योजना प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले. बीजोत्पादन, फळबाग लागवड तसेच नावीन्यपूर्ण पीक पद्धतींना प्रोत्साहन दिले. त्यांच्या जागी नियुक्त झालेले श्री. डाबरे यांनी यापूर्वी बुलडाण्यात विविध पदांवर दीर्घकाळ काम केले आहे. .अकोल्याची जबाबदारी कोणाकडे? श्री. किरवे हे बुधवारी (ता. २४) अकोल्यातून कार्यमुक्त झाले. ते नंदुरबारला रुजू होत आहेत. अशा स्थितीत आता अकोल्याचा पदभार कोण सांभाळेल असा प्रश्न आहे. आत्मा प्रकल्प संचालक डाॅ. मुरली इंगळे हे या पदासाठी पात्र आहेत. उर्वरित सर्व अधिकारी नवे आहेत. डाॅ. इंगळे यांनी यापूर्वीही हा पदभार स्वीकारला होता. त्यांनी नकार दिल्यास पेच तयार होऊ शकतो. नवीन अधिकारी येईपर्यंत इतर जिल्ह्यांकडे पदभार सोपवण्यासारखी स्थिती उद्भवण्याची शक्यताही नाकारता येत नाही..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.