Agriculture News : सोलापूर ‘एल निनो’च्या प्रभावामुळे सोलापूर जिल्ह्यात ऑगस्ट २०२६ अखेरपर्यंत केवळ १८९ मिलिमिटर पाऊस झाला आहे. परतीचा पाऊस न झाल्यास उद्भवणाऱ्या संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी पशुसंवर्धन व कृषी विभागाने तालुका, मंडळ आणि गावनिहाय काटेकोर नियोजन करावे. जिल्ह्यात कुठेही चाऱ्याचा तुटवडा जाणवणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले. .या नियोजनाला बळ देण्यासाठी त्यांनी जिल्हा नियोजन समितीतून चारा बियाणांसाठी अतिरिक्त १ कोटी रुपयांचा निधी तत्काळ मंजूर केला..Rain Deficit: पुढ्यातील तिढा.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, पशुसंवर्धन उपायुक्त विशाल येवले, उजनी धरण व्यवस्थापन अधीक्षक अभियंता सुभवेंद्र खांडेकर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते..Maharashtra Monsoon Session: अधिवेशनात कर्जमाफी, पीकविमा मुद्दे गाजणार.जिल्हाधिकारी कार्तिकेयन म्हणाले, की उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यात पुढील तीन महिने, तर उर्वरित तालुक्यांत चार ते पाच महिने पुरेल एवढा चारा उपलब्ध आहे. जिल्ह्यात १२ लाख मोठी आणि ८ लाख लहान जनावरे आहेत. रोज २२ हजार मेट्रिक टन चाऱ्याची गरज असून ५२ लाख ४०० टन चारा उपलब्ध होणार आहे. उजनी धरण १०० टक्के भरले आहे. जलसंपदा विभागाने ३९ के.टी. वेअर दुरुस्तीसाठी आवश्यक ७ कोटी रुपयांच्या निधीची मागणी नियोजन समितीकडे करावी, असेही ते म्हणाले..१०५ टक्के पेरणी पूर्णजिल्ह्यात १८९ मिलिमिटर पाऊस झाला असून करमाळा तालुक्यात सरासरीच्या ८६ टक्के, तर इतर तालुक्यांत पावसाचे प्रमाण कमी आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात १०५ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.