Drone Distribution : वेताळे गावच्या सुवर्णा बोंबले यांना पहिल्या ड्रोनचे वाटप

Agricultural Drone : केंद्र सरकारच्या ‘विकसित भारत’ योजनेतून ‘ड्रोन दिदी’ ही योजना सुरू केली आहे.
Drone Distribution
Drone DistributionAgrowon
Published on: 
Updated on: 

अॅग्रोवन वृत्तसेवा
Drone Didi Scheme : पुणे : केंद्र सरकारच्या ‘विकसित भारत’ योजनेतून ‘ड्रोन दिदी’ ही योजना सुरू केली आहे. या योजनेतून चंबळ फर्टिलायझर अँड केमिकल्स या कंपनीचे विपणन विभागाचे उपव्यवस्थापक समाधान काळे यांच्या हस्ते ड्रोन फवारणी यंत्र खेडमधील वेताळे येथील सुवर्णा बोंबले यांना वितरित करण्यात आले.

खेड तालुक्यातील भामा भीमा फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या महिला बचत गटातील सुवर्णा संतोष बोंबले पाटील यांना चंबळ फर्टिलायझर अँड केमिकल्स लिमिटेडकडून ड्रोन फवारणी यंत्राचे ग्वाल्हेर, मध्य प्रदेश येथे दहा दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले होते. या ड्रोन फवारणी यंत्रामुळे कमी वेळेमध्ये जास्त क्षेत्रावर फवारणी करण्यात येणार असून वेळेची बचत, औषधाची बचत व अचूक फवारणी देखील होणार आहे.  

Drone Distribution
Agricultural Drone : ड्रोनचे विविध घटक अन् त्यांचे कार्य

ड्रोन फवारणी यंत्राच्या वितरणप्रसंगी भामा भीमा फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे चेअरमन अनिल कदम, संचालक संतोष बोंबले पाटील व सीईओ अतुल डेरे व बचत गटातील महिला उपस्थित होत्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com