Crop Loan : परभणीत वर्षभरात १ हजार ४५३ कोटींवर पीककर्जाचे वितरण

परभणी जिल्ह्यातील १७ बँकांना २०२२-२३ या आर्थिक वर्षात ३१ मार्च अखेरपर्यंत खरीप आणि रब्बी हंगामात मिळून एकूण १ हजार ८२८ कोटी ९५ लाख रुपये एवढे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिलेले होते.
Crop Loan
Crop LoanAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : परभणी जिल्ह्यातील १७ बँकांना २०२२-२३ या आर्थिक वर्षात ३१ मार्च अखेरपर्यंत खरीप आणि रब्बी हंगामात (Rabi Season) मिळून एकूण १ हजार ८२८ कोटी ९५ लाख रुपये एवढे पीककर्ज वाटपाचे (Distribution of crop loans) उद्दिष्ट दिलेले होते.

प्रत्यक्षात १ लाख ८९ हजार ३०२ शेतकऱ्यांना १ हजार ४५३ कोटी ३३ लाख रुपये (७९.४६ टक्के) पीककर्ज वाटप करण्यात आले.

त्यात खरिपातील ८३६ कोटी ३५ लाख रुपये (६९.४६ टक्के) टक्के आणि रब्बी तील ६१६ कोटी ९८ लाख रुपये (९८.७५ टक्के) पीककर्जाचा समावेश आहे.

२०२१-२२ च्या तुलनेत २०२२-२३ या आर्थिक वर्षात एकूण पीक कर्जाच्या रकमेत २६१ कोटी ४१ लाख रुपयांनी तर कर्ज मिळालेल्या शेतकऱ्यांच्या संख्येत २६ हजार ४६२ एवढी वाढ झाली आहे, अशी माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक सुनील हट्टेकर यांनी दिली.

Crop Loan
Crop Loan : पीककर्ज व्याजाच्या रकमेचा परतावा मिळावा

जिल्ह्यातील बँकाना २०२२-२३ च्या खरीप हंगामात १ हजार २०४ कोटी १५ लाख रुपये उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात १ लाख ९ हजार २१ शेतकऱ्यांना ८३६ कोटी ३५ लाख रुपये (६९.४६ टक्के) पीककर्ज वाटप करण्यात आले.

खरिपात महाराष्ट्र ग्रामीण बँकेने (१५५.३८ टक्के) आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (१०४.१८ टक्के) या दोन बँकांनीच उद्दिष्टापेक्षा जास्त पीककर्ज वितरित केले. राष्ट्रीयकृत बँकांनी ४५.७९ टक्के आणि खाजगी बँकांनी ३९.८९ टक्के वाटप केले.

त्याआधीच्या वर्षीच्या तुलनेत खरीप पीककर्ज वाटपात ८७.५५ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. रब्बी हंगामात ६२४ कोटी ८० लाख रुपये उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात ८० हजार २८१ शेतकऱ्यांना ६१६ कोटी ९८ लाख रुपये (९८.७५ टक्के) वाटप झाले.

त्याआधीच्या वर्षीच्या तुलनेत यंदा रब्बीत १७३ कोटी ८७ लाख रुपयांनी वाढ झाली आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी १०९.४२ टक्के आणि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १००.४३ टक्के वाटप केले. खाजगी बँकांनी ३९.७१ टक्के, महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ८३.७४ टक्के पीककर्ज वाटप केले.

पीककर्ज वाटपाचा आलेख चढता.....

२०२१-२२ मध्ये दोन्ही हंगामात मिळून एकूण १ लाख ६२ हजार ८४० शेतकऱ्यांना तर २०२२-२३ मध्ये १ लाख ८९ हजार ३०२ शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्यात आले.

जिल्ह्यात २०१५-१६ आणि २०१६-१७ या वर्षी अनुक्रमे १०६ टक्के आणि १०८ टक्के पीककर्ज वाटप झाले होते. २०२०-२१ पासून दरवर्षी पीकर्जाचा वाटपाचा आलेख चढता आहे. २०२२-२३ मध्ये सलग सहाव्या वर्षी पीककर्ज वाटपाची उद्दिष्टपूर्ती झाली नाही.

तुलनात्मक पीककर्ज वाटप स्थिती (रक्कम कोटी रुपये)

वर्षे - उद्दिष्ट रक्कम- वाटप रक्कम- - टक्केवारी

२०१९-२०- १७८४.००- ४२४.१६ - २३.८३

२०२०-२१ - २१०७.०७ - १३५२.८०- ६४.२०

२०२१-२२ - १८२०.२०- ११९१.९१ - ६५.४८

२०२२-२३ - १८२८.९५ - १४५३.३३ - ७९.४६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com