Crop Loan Disbursement : परभणी जिल्ह्यात ५९८ कोटी ७६ लाख रुपये पीककर्ज वाटप

Crop Loan Update : परभणी जिल्ह्यातील बँकांनी यंदाच्या खरीप हंगामात गुरुवार (ता. १५)पर्यंत ७४ हजार ७५५ शेतकऱ्यांना ५९८ कोटी ७६ लाख रुपये (४०.७१ टक्के) पीककर्ज वाटप केले आहे.
Agriculture Loan
Agriculture Loan Agrowon
Published on
Updated on

Parbhani News : परभणी जिल्ह्यातील बँकांनी यंदाच्या खरीप हंगामात गुरुवार (ता. १५)पर्यंत ७४ हजार ७५५ शेतकऱ्यांना ५९८ कोटी ७६ लाख रुपये (४०.७१ टक्के) पीककर्ज वाटप केले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने उद्दिष्टाच्या १०१.८५ टक्के पीककर्ज वाटप केले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे ९१.२३ टक्के कर्जवाटप झाले आहे. मात्र राष्ट्रीयीकृत बँकांचे २५ टक्क्यांच्या, तर खासगी बँकाचे पीककर्ज वाटप २० टक्क्यांच्या आत आहे.

Agriculture Loan
Crop Loan Distribution : खरिपासाठी १,२७८ कोटीचे कर्ज वितरण

जिल्ह्यातील या वर्षीच्या खरिपात राष्ट्रीयीकृत, ग्रामीण, सहकारी, खासगी मिळून एकूण १७ बँकांना १ हजार ४७० कोटी ९७ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यात राष्ट्रीयीकृत बँकांना (व्यापारी बँका) एकूण ९४७ कोटी ८८ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेला २२७ कोटी ३९ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १७२ कोटी ९४ लाख रुपये, खासगी बँकांना १२२ कोटी ७६ लाख रुपये उद्दिष्टांचा समावेश आहे.

Agriculture Loan
Crop Loan Distribution : खरिपातील पीककर्ज वाटपास गती

गुरुवार (ता. १५)पर्यंत राष्ट्रीयीकृत बँकांनी १६ हजार ७१२ शेतकऱ्यांना १९१ कोटी ९० लाख रुपये (२०.२५ टक्के) पीककर्ज वाटप केले. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने १९ हजार ८६३ शेतकऱ्यांना २०७ कोटी ४५ लाख रुपये (९१.२३ टक्के), जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ३६ हजार ८८४ शेतकऱ्यांना १७६ कोटी १४ लाख (१०१.८५ टक्के) कर्ज दिले. खासगी बँकांनी १ हजार २९६ शेतकऱ्यांना २३ कोटी२७ लाख रुपये (१८.९६ टक्के) पीककर्ज वाटप केले आहे.

परभणी जिल्हा पीककर्ज वाटप स्थिती (कोटी रुपये)

बँक उद्दिष्ट वाटप रक्कम टक्केवारी शेतकरी संख्या

भारतीय स्टेट बँक ६०७.७० १४७.४६ ४२.२७ १३०६५

महाराष्ट्र ग्रामीण बँक २२७.३९ २०७.४५ ९१.२३ १९८६३

जिल्हा सहकारी बँक १७२.९४ १७६.१४ १०१.८५ ३६८८४

बँक ऑफ बडोदा ६९.७७ ४.७९ ६.९७ ५५१

बँक ऑफ इंडिया १२.५० ०.५३ ४.२४ ६९

बँक ऑफ महाराष्ट्र ८५.५७ १७.३९ २०.३२ १३०३

कॅनरा बँक ५०.१४ २.१८ ४.३५ ३८७

सेंट्रल बँक ऑफ इंडिया १२.८३ २.८८ २२.४५ २४२

इंडियन बँक २५.५५ १.३५ ५.२८ १२७

इंडियन ओव्हरसीज बँक ११.०१ १.४७ १३.३५ १४७

पंजाब नॅशनल बँक ११.४९ ०.६४ ५.५७ ४८

युको बँक २५.०६ २.७९ ११.१३ ३०८

युनियन बँक ऑफ इंडिया ३६.२६ १०.४२ २८.७४ ४९४

अॅक्सिस बँक १३.२६ २.५१ १८.९३ ८

एचडीएफसी बँक ४०.४८ ८.३१ २०.५३ ४२३

आयसीआयसीआय बँक ३१.९५ १०.२५ ३२.०८ ६४४

आयडीबीआय बँक ३७.०७ २.२० ५.९३ २२१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com