Maharashtra Power : छत्रपती संभाजीनगर महावितरणच्या वीजयंत्रणेतील तांत्रिक व जोखमीची कामे करण्यासाठी खासगी व्यक्ती किंवा अनधिकृत मनुष्यबळाचा वापर करू नये. असे प्रकार आढळून आल्यास तसेच त्यातून विद्युत अपघात किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्यास संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर बडतर्फी किंवा सेवासमाप्तीसारखी कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महावितरणने दिला आहे..महावितरणच्या वीजयंत्रणेतील नादुरुस्त वितरण रोहित्र बदलणे, डीओ फ्यूज बदलणे, विद्युत वाहिनीतील बिघाड शोधणे, तांत्रिक दुरुस्ती, ग्राहकांच्या वीजपुरवठ्याच्या तक्रारी सोडवणे, वीजबिल वसुली आणि थकबाकीदार ग्राहकांचे मीटर काढणे आदी कामांची जबाबदारी तारमार्ग संवर्गातील तांत्रिक कर्मचाऱ्यांवर आहे..Khadi Board Employee Shortage : आकृतिबंधातून आवश्यक मनुष्यबळ मिळण्याची आशा; खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती साठे यांची माहिती.मात्र, काही कर्मचारी ही कामे स्वतः न करता खासगी व्यक्ती किंवा अनधिकृत मनुष्यबळाकडून करून घेत असल्याच्या तक्रारी महावितरणच्या मुख्यालयाला प्राप्त झाल्या आहेत. अशा व्यक्तींना पुरेसे तांत्रिक ज्ञान व विद्युत सुरक्षेचे प्रशिक्षण नसल्याने अपघाताचा धोका वाढतो. तसेच ग्राहक आणि महावितरणच्या मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता असते..Gram Sabha Bhandara: ग्रामसभा झाली ७ सप्टेंबरला; मग १७ ऑगस्टचे पत्र आले कुठून?.याबाबत संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी परिपत्रक काढून क्षेत्रीय मुख्य अभियंते व अधीक्षक अभियंत्यांना निर्देश दिले आहेत. ‘सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटी (मेझर्स रिलेटिंग टू सेफ्टी अॅण्ड इलेक्ट्रिक सप्लाय) रेग्युलेशन्स २०२३’मधील नियम ३ नुसार केवळ अधिकृत व्यक्तींनाच वीज वितरण सेवेशी संबंधित कामे करण्याची परवानगी आहे..अनधिकृत मनुष्यबळाचा वापर किंवा त्यातून दुर्घटना, अपघात अथवा मालमत्तेचे नुकसान झाल्यास तातडीने चौकशी करावी. चौकशीअंती दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सेवाविनियमांनुसार बडतर्फी किंवा सेवासमाप्तीसारखी कारवाई केली जाईल, असे निर्देश देण्यात आले आहेत. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात अशा प्रकारे खासगी मनुष्यबळाचा वापर होत नसल्याची वेळोवेळी खातरजमा करावी, असेही आदेश देण्यात आले आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.