Agriculture Technology: आंबा शेतकऱ्यांना विक्रीसंदर्भात अनेक पर्यंत उपलब्ध आहेत. डिजिटल तंत्राद्वारे विक्रीची गरज आहे. कोणत्या देशात आंब्याला मागणी आणि चांगला दर मिळेल याची माहिती या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्याला कळेल आणि त्याचा फायदा होईल. या तंत्रज्ञानासाठी परदेशांवर अवलंबून राहून चालणार नसल्याचे मत रसायनशास्त्र तंत्रज्ञान संस्थेचे (आयसीटी) कुलपती प्रा. जे. बी. जोशी यांनी व्यक्त केले..मुंबई येथील आयसीटी येथे बुधवारी (ता. १) महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाने हवामान बदल, कृषी फलोत्पादन, सेंद्रिय सिंचन, मार्केटिंग फूड, गुंतवणूक, सौरऊर्जा विषयावरील परिषदेत ते बोलत होते. प्रा. जोशी यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन केले. या वेळी राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल स्वागताध्यक्ष तर प्रमुख पाहुणे म्हणून आयसीटीचे कुलगुरू प्रा. अनिरुद्ध पंडित, जवाहरलाल नेहरू पोर्ट ॲथॉरिटीच्या वाहतूकचे मुख्य व्यवस्थापन गिरीश थॉमस उपस्थित होते..Digital Agriculture: ‘महाविस्तार’ डाऊनलोडींगमध्ये कऱ्हाड राज्यात अव्वल.प्रा. जोशी म्हणाले, की तंत्रज्ञानाबाबत आपण परदेशांवर अवलंबून आहे. अनेक कारखाने आणि तंत्रज्ञानाच्या संदर्भात परदेशातून भरपूर गोष्टी आणतो आणि केवळ आपल्या देशात जोडणी करतो. यामुळे आपण ज्ञानाच्या क्षेत्रात परदेशावर अवलंबून राहतो. हेच आपल्या गरिबीचे कारण आहे. मी आतापर्यंत बांबू, ऊस आणि सोयाबीनसारख्या शेतीपिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी संशोधन केले. परंतु आतापर्यंत आंब्याचे उत्पादन वाढवण्याच्या विषयाला हात घातला नाही. परंतु यापुढे या क्षेत्रात काम करून उत्पादनवाढीसाठी काम करेन..कुलगुरू प्रा. पंडित म्हणाले, की आज देशामध्ये असलेल्या कोल्ड स्टोरेजची यंत्रणा खूप असतानाही २५ टक्के उत्पादने वाया जातात. देशात प्रगतिशील शेतकरी खूप थोडे आहेत. यामुळे नवीन प्रयोग करण्याची शेतकऱ्यांची मानसिकता बदलली पाहिजे. गुजराती माणूस शेती धंदा म्हणून करतो ती मानसिकता ठेवली पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रगतिशील लोक वाढवण्याची गरज आहे. शेतीचा हा अत्यंत चांगला व्यवसाय आहे..Mango Farming: निर्यातयोग्य केसर आंबा उत्पादनाचे तंत्र.श्री. मोकल यांनी आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे आंब्याचे उत्पन्न ४० टक्क्यांवरून घटून ते केवळ १० टक्केच्या जवळपास आल्याचे सांगितले. दरवर्षी उत्पादन झालेल्या आंब्याची १५ टक्के निर्यात होते. मात्र यंदा एकीकडे उत्पादन कमी झालेले आणि दुसरीकडे आखाती युद्धामुळे निर्यात ठप्प झाली आहे. या वेळी कृषी विभागाचे सहसंचालक शिवाजी आमले, संदेश पाटील आदी उपस्थित होते. या वेळी सिद्धेश्वर ॲग्रोटेकच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले..तंत्रज्ञानाची माहिती देणारे सादरीकरणया परिषदेत नावीन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या राज्यभरातील शेतकऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तर दुसरीकडे शेतीला पूरक असलेल्या तंत्रज्ञानाची माहिती देणारे सादरीकरण विविध कंपन्यांकडून करण्यात आले. यात प्लॅनेट आय फॉर्म एआय लिमिटेड, टाटा मोटर्स, सेक्युरेशन, एचयूआरएल, टाटा पॉवर आदींकडून सादरीकरण करण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.