Farmer ID : ॲग्रीस्टॅक योजनेत तीन लाख शेतकऱ्यांची नोंदणी

Agristack Yojana : कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर व्हावा, यासाठी राज्यात ॲग्रीस्टॅक योजना राबविण्यात येत आहे. ही मोहीम मागील तीन महिन्यापासून राबविण्यात येत आहे.
Farmer ID
Farmer ID Agrowon
Published on
Updated on

Nanded News : कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर व्हावा, यासाठी राज्यात ॲग्रीस्टॅक योजना राबविण्यात येत आहे. ही मोहीम मागील तीन महिन्यापासून राबविण्यात येत आहे. या काळात केवळ दोन लाख ९३ हजार शेतकऱ्यांची नोंदणी केली आहे. परंतु शेतकऱ्यांमध्ये या योजनेविषयी अफवा पसरविण्यात येत असल्याने नोंदणीला अपेक्षित गती येत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांना ओळख क्रमांक मिळावा, यासाठी ॲग्रीस्टॅक योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक गावात सर्व शेतकऱ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) तयार करण्यात येत आहेत. यामुळे विविध योजनेसाठी अपेक्षित फायदा होणार आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी करण्यामध्ये सुलभता येणार आहे. पीककर्ज मिळण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड आणि कृषी पायाभूत निधी व शेतीच्या विकासासाठी इतर कर्जे उपलब्ध करून घेण्यात सुलभता येणार आहे.

Farmer ID
Farmer ID : शासकीय योजनांच्या लाभासाठी शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य

पीक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईसाठी सर्वेक्षण करणे, किमान आधारभूत किमतीवर खरेदीमध्ये शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी या बाबी होणार आहेत. यासोबतच शेतकऱ्यासाठी कृषीकर्ज, वित्त, निविष्ठा आणि इतर सेवा देणाऱ्या यंत्रणांना कृषी सेवा सहजपणे उपलब्ध करून देता येईल. विविध सरकारी योजनांचा लाभ, कृषी व संलग्न विभागांना शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेताचा आधार संलग्न माहिती संचाच्या उपलब्ध आकडेवारीच्या आधारे योजनांचा लाभ वितरित करण्यामध्ये सुलभता येणार आहे.

तसेच लाभार्थ्यांना वारंवार प्रमाणीकरणाची आवश्यकता राहणार नाही. शेतकऱ्यांना वेळेवर कृषिविषयक सल्ले, विविध संस्थाकडून संपर्क करण्याच्या संधीमध्ये वाढीसह नावीन्यपूर्ण कार्यक्रमांच्या विस्तार व प्रचारात सफलता प्राप्त होणार आहे. शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचे लाभ प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या गावात मोहिमेच्या दिवशी शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त करून घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून मागील तीन महिन्यांपासून करण्यात येत आहे.

Farmer ID
Farmer ID Registration: ‘फार्मर आयडी’ नोंदणीत पुणे तिसरे; साडेचार लाख शेतकऱ्यांना लाभ

परंतु या योजनेत शेतकऱ्यांच्या नोंदणीला अपेक्षित गती येताना दिसत नाही. जिल्ह्यात साडेसात लाखांपेक्षा अधिक शेतकरी असण्याची शक्यता आहे. प्रशासनाने मात्र पीएम किसान योजनेच्या पाच लाख पाच हजार ५८१ लाभार्थी गृहीत धरून आकडेवारीनुसार आजपर्यंत दोन लाख ९३ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी झाल्याची माहिती मिळाली.

अनावश्यक अफवेमुळे नोंदणीकडे पाठ

ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक तयार करण्यात येत आहेत. यात शेतकऱ्यांच्या शेतीची सर्वच माहिती संकलित होणार असल्याने सरकारकडून मोठ्या शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतरित करून त्यांचे सर्वच लाभ काढून घेण्यात येणार असल्याची अफवा शेतकऱ्यांमध्ये पसरविण्यात आल्या आहेत. परंतु प्रशासनाने मात्र अशा प्रकारची कोणतीही भीती न बाळगता नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com