Youth Finance: साडेतीनशे वर्षांपूर्वी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी आपल्या वाटणीची सावकारी कर्जखते इंद्रायणीच्या डोहात बुडवून सामान्य माणसाला पाशातून मुक्त केले होते. आज त्याच महाराष्ट्रात आधुनिक सावकारांनी थेट तरुणांच्या खिशात आणि तळहातातील मोबाइलमध्ये प्रवेश केला आहे. इंद्रायणीत बुडवलेली ती कर्जखते आज डिजिटल ॲप्स, क्रेडिट कार्डस् आणि ऑप्शन्स ट्रेडिंगच्या लाल-हिरव्या आकड्यांच्या रूपाने पुन्हा जिवंत झाली आहेत..पश्चिम महाराष्ट्रातील एका खेड्यात राहणारा गजानन नावाचा तरुण शेतकरी. वडिलोपार्जित तीन एकर बागायती शेती आणि जोडीला चार संकरित गाईंचा गोठा सांभाळत तो संसाराचा गाडा ओढत होता. अंगात कष्ट करण्याची धमक, गावात प्रामाणिक माणूस म्हणून लौकिक आणि शेती-दुग्ध व्यवसायातून मिळणारा स्थिर नफा, यामुळे त्याचे कुटुंब सुखासमाधानाने जगत होते. पण दोन वर्षांपूर्वी एका क्षुल्लक मोहाने त्याच्या आयुष्याला अनपेक्षित वळण दिले..Agrowon Diwali Article: शोभिवंत रोपांतून विस्तारले व्यवसायाचे क्षितिज.गावातील दूध डेअरीवर बसलेल्या काही समवयस्क मित्रांकडून त्याला मोबाइलवर अवघ्या पाच मिनिटांत झटपट कर्ज देणाऱ्या ॲप्सची माहिती मिळाली. गजाननच्या मनात बऱ्याच दिवसांपासून एक महागडा स्मार्टफोन घेण्याची सुप्त इच्छा होती. ‘कशाला शेतीचे कष्टाचे पैसे मोडायचे? ॲपवरून कर्ज काढू आणि फोन घेऊ,’ असा सोईस्कर विचार करून त्याने ते ॲप डाउनलोड केले. इंग्रजीतील किचकट अटी-शर्ती न वाचताच त्याने मोबाइलमधील फोटो आणि संपर्क यादी वापरण्याची परवानगी दिली. क्षणात त्याच्या खात्यात वीस हजार रुपये जमा झाले..नव्या फोनचा आनंद अवघे काही दिवसच टिकला. दुसऱ्या महिन्यापासून परतफेडीसाठी अनोळखी क्रमांकांवरून धमक्यांचे फोन सुरू झाले. वीस हजारांच्या कर्जावर दरमहा १० ते १५ टक्के अवाजवी व्याज आकारले जात होते. निसर्गानेही दगा दिला; अवकाळी पावसाने कांद्याची पात मातीत मिसळली आणि दुधाचे दरही घसरले. हप्ता चुकला आणि सुरू झाला असह्य मानसिक छळ. ॲप कंपन्यांच्या वसुली गुंडांनी गजाननच्या मोबाइलमधील संपर्कांवर फोन करून ‘गजानन चोर आहे’ असे संदेश धाडले. एवढेच नव्हे, तर घरातील महिलांचे फोटो मॉर्फ करून नातेवाइकांना पाठवण्याची उघड धमकी दिली..Agrowon Diwali Article: उत्पन्नाचा बहुपदरी पॅटर्न.या विळख्यातून सुटण्यासाठी गजाननने मित्राच्या सल्ल्याने शेअर बाजारातील ‘ऑप्शन्स ट्रेडिंग’चा (F&O) सट्टा सुरू केला. ‘रोज सकाळी अर्धा तास काम कर, दोन हजार सहज मिळतील; सगळे कर्ज आठ दिवसांत फिटेल!’ या भूलथापांना भुलून गजाननने खासगी सावकाराकडून दरमहा पाच टक्के व्याजाने एक लाख रुपये काढले आणि ट्रेडिंगमध्ये ओतले. सुरुवातीला दोन दिवसांत चार हजार रुपये मिळाले, पण तिसऱ्या दिवशी बाजाराच्या एका मोठ्या झटक्यात त्याचे सव्वा लाख रुपये अवघ्या दहा मिनिटांत भस्मसात झाले..आज गजाननच्या दारात सावकार आणि वसुली एजंट्स उभे आहेत. घरात रोजची धुसफूस, मुलांच्या शाळेची थकलेली फी आणि आत्मसन्मान धुळीस मिळालेली स्थिती आहे..गजाननची ही गोष्ट प्रातिनिधिक आहे; पण ती आजच्या महाराष्ट्राच्या छातीवर पडलेला खोल घाव आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी आपल्या वाटणीची सावकारी कर्जखते इंद्रायणीच्या डोहात बुडवून सामान्य माणसाला पाशातून मुक्त केले होते. आज त्याच महाराष्ट्रात आधुनिक सावकारांनी थेट तरुणांच्या खिशात आणि तळहातातील मोबाइलमध्ये प्रवेश केला आहे. इंद्रायणीत बुडवलेली ती कर्जखते आज डिजिटल ॲप्स, क्रेडिट कार्डस् आणि ऑप्शन्स ट्रेडिंगच्या लाल-हिरव्या आकड्यांच्या रूपाने पुन्हा जिवंत झाली आहेत.(संपूर्ण लेख वाचा २०२६ च्या ॲग्रोवन दिवाळी अंकात).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.