Crop Insurance : पीकविम्यासाठी सात-बारा मिळेना; ‘सर्व्हर डाउन’, संकेतस्थळही बंद

Fruit Crop Insurance Scheme : फळपीक विमा मुदतीच्या पूर्वसंध्येला निर्माण झालेल्या या घोळामुळे नेमके काय करावे हे शेतकऱ्यांना सुचेनासे झाले आहे.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon
Published on
Updated on

Sindhudurg News : सर्व्हर बंद असल्यामुळे फळपीक विम्यासाठी आवश्यक असलेला ई-पीक पाहणीचा सात-बारा शेतकऱ्यांना मिळेनासा झाला असून विमा कंपनीचे संकेतस्थळदेखील काही काळ बंद झाल्यामुळे आंबा, काजू बागायतदारांची चांगलीच दमछाक झाली.

फळपीक विमा मुदतीच्या पूर्वसंध्येला निर्माण झालेल्या या घोळामुळे नेमके काय करावे हे शेतकऱ्यांना सुचेनासे झाले आहे. दरम्यान गुरुवारी (ता. ३०) सकाळपासून सर्व्हर सुरू झाला आहे.

हवामानावर आधारित फळपीक विमा हप्ता भरण्याची मुदत गुरुवारी (ता. ३०) संपली. या योजनेत सहभागी होण्यासाठी ई-पीक पाहणीचा सात-बारा आवश्यक असल्याने बुधवारी सकाळपासून जिल्ह्यातील सर्व तलाठी कार्यालयांत शेतकऱ्यांनी गर्दी केली. परंतु सर्व्हरच बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय झाली.

Crop Insurance
Fruit Crop Insurance : फळ पीकविमा योजनेतून अनेकांना परताव्यांची प्रतीक्षा

दिवसभर तलाठी कार्यालयात शेतकरी ठाण मांडून बसले परंतु सर्व्हर बंद असल्यामुळे तलाठीदेखील हतबल होते. काही शेतकऱ्यांनी ऑफलाइन सात-बाराची मागणी केली परंतु हा सात-बारा पीक विम्यासाठी ग्राह्य मानला जात नसल्याने तो मार्गदेखील बंद झाला. शेतकरी सायकांळी उशिरापर्यंत तलाठ्यांना फोन करून सर्व्हर सुरू झाला का अशी विचारणा करीत होते.

Crop Insurance
Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेला थंड प्रतिसाद

परंतु उशिरापर्यत सर्व्हर सुरू झाला नव्हता. अखेर रिकाम्या हाती शेतकऱ्यांना परतावे लागले. एकीकडे सर्व्हर बंद होता तर दुसरीकडे कंपनीचे संकेत स्थळदेखील काही काळ बंद होते. त्यामुळे दुहेरी संकटात शेतकरी होता. दुपारनंतर संकेतस्थळ सुरू झाले. मुदत संपण्याच्या एक दिवस अगोदर हा घोळ झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले.

काही तांत्रिक दोषामुळे दोन दिवस सर्व्हर बंद होता. सर्व्हरमधील दोष दूर झाला असून गुरुवारी सकाळपासून सात-बारा देण्याचे काम सुरू झाले. शेतकऱ्यांनी आपआपल्या तलाठी कार्यालयातून सात-बारा घेऊन पीकविम्याची प्रक्रिया पूर्ण करावी.
- दीप्ती देसाई, तहसीलदार, वैभववाडी
मी बुधवारी सकाळपासून तलाठी कार्यालयात होतो. परंतु सर्व्हर डाऊन असल्यामुळे मला सायकांळी उशिरापर्यंत सात-बारा मिळाला नाही. ऑफलाइन सात-बारा ग्राह्य मानला जात नाही. त्यामुळे पीक विमा हप्ता भरता आला नाही.
- सुनील पवार, शेतकरी, खांबाळे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com