Dharashiv District Cooperative Bank : धाराशिव ‘डीसीसी’ची कात टाकण्यास सुरुवात

District Bank Update : होम ट्रेड रोखे गैरव्यवहारामुळे गेली अनेक वर्ष आर्थिक सावटातून वाटचाल करत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आता कात टाकण्यास सुरुवात केली आहे.
Dharashiv District Cooperative Bank
Dharashiv District Cooperative BankAgrowon
Published on
Updated on

Dharashiv News : होम ट्रेड रोखे गैरव्यवहारामुळे गेली अनेक वर्ष आर्थिक सावटातून वाटचाल करत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आता कात टाकण्यास सुरुवात केली आहे. बँकेला गतवैभव मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रण समितीची स्थापना केली असून, समितीने सूत्र हाती घेतल्यानंतर बँकेने शेतीशी संबंधित कागदपत्र वितरणातून उत्पन्नाचा पहिला मार्ग चोखाळला आहे. यातूनच बँकेच्या ३७ शाखांतून शेतकऱ्यांना कमी दरात डिजिटल सातबारासह आठ अ व फेरफारची नक्कल देण्यात येणार आहे.

या प्रणालीसाठी बँकेने पुण्याच्या जमाबंदी आयुक्त कार्यालयासोबत सामंजस्य करारही केला आहे. बँकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासह बँकेला गतवैभव मिळवून देण्यासाठी समितीकडून विविध उपाययोजनांची आखणी करण्यात येत आहे.

Dharashiv District Cooperative Bank
District Bank Report : प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा बँकेचा अहवाल शासनाकडे देऊ

याचाच एक भाग म्हणून सातबारा व अन्य कागदपत्रांच्या वितरणातून बँकेच्या तिजोरीत थोडी भर टाकण्याचे प्रयत्न आहेत. या वितरण प्रणालीसाठी बँकेने २०२१ मध्ये करार केला होता. त्याची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार असून त्यांना शेतीच्या कागदपत्रासाठी आता तलाठ्यांची वाट पाहण्याची गरज पडणार नाही.

Dharashiv District Cooperative Bank
Dharashiv DCC Bank : थकबाकीदार संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची हजेरी

जमाबंदी आयुक्त कार्यालयाच्या पोर्टलवरून बँकेकडून कमी दरात ही कागदपत्र शेतकऱ्यांना वितरित केले जाणार आहेत. सातबारा आठ अ, सहा ड, (फेरफार नक्कल) देण्याची सुविधा असून यातून बँकेला उत्पन्न, तर शेतकऱ्यांना कमी दरात कागदपत्रे मिळणार आहेत. याचा शेतकऱ्यांना लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, उपाध्यक्ष मधुकर मोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय घोणसे पाटील व संचालक मंडळाने केले आहे.

...या शाखांमध्ये मिळणार सुविधा

संनियंत्रण समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे व संचालक मंडळाने सुचविल्यानुसार बँकेच्या धाराशिव तालुक्यातील मुख्य शाखा, बेंबळी, ढोकी, समुद्रवाणी, तेर, सारोळा, जागजी, तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर, अणदूर, तामलवाडी, मंगरुळ, काटगाव, सलगरा (दिवटी), काटी, उमरगा तालुक्यातील उमरगा, मुरूम, बलसूर, नारंगवाडी, गुंजोटी, तुरोरी, कळंब तालुक्यातील कळंब, येरमाळा, शिराढोण, इटकूर, दहीफळ, भूम तालुक्यातील भूम, ईट, वालवड, गिरवली, परंडा, तालुक्यातील परंडा, जवळा (नि.), सोनारी, वाशी तालुक्यातील वाशी, तेरखेडा, लोहारा तालुक्यातील लोहारा, माकणी, अचलेर या शाखांमध्ये सातबारा, आठ अ, फेरफार नक्कल देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com