Agriculture Department Scam: कृषी विभागातील कोट्यवधी रुपयांचा निविष्ठा गैरव्यवहार उघडकीस येऊन १४ अधिकारी निलंबित झाल्यानंतर जिल्ह्यातील वातावरण गढूळ झाले आहे. मंगळवारी (ता. ११) लोहारा येथे निलंबित कृषी अधिकाऱ्यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. त्यानंतर बुधवारी (ता. १२) सकाळी प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (एसएओ) राजेंद्र साळवे यांच्या चेहऱ्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी शाई फेकून पलायन केल्याची घटना घडली..कृषी निविष्ठा गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. घटनेनंतर कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या असून, त्यांनी बुधवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे..Agriculture Office Misconduct: अकोल्यातील घटनेचा कृषी राजपत्रित अधिकारी संघटनेकडून निषेध.साळवे हे बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील आपल्या कार्यालयाकडे येत असताना एक अज्ञात व्यक्ती त्यांच्या जवळ आला. त्याने अचानक त्यांच्या चेहऱ्यावर शाई फेकून जिल्ह्यात काम न करण्याची धमकी दिली. त्यानंतर दोन्ही व्यक्ती तेथून निघून गेले..घटनेची माहिती मिळताच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी एकत्र आले. त्यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध करून दोषींवर कारवाईची मागणी केली. कृषी निविष्ठा गैरव्यवहारामुळे काही दिवसांपासून कृषी विभागातील अधिकाऱ्यांवर आरोप केले जात आहेत. सरकारने १४ अधिकाऱ्यांविरुद्ध निलंबनाची कारवाई केली असून, दोघांविरुद्ध विभागीय चौकशी सुरू आहे. तरीही काही अधिकाऱ्यांना अभय दिल्याचा आरोप केला जात आहे..या पार्श्वभूमीवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदावर येण्यास कोणीही उत्सुक नसल्याचे सांगितले जात आहे. या पदाचा पदभार स्वीकारण्यासही कोणी तयार नसताना साळवे यांनी प्रभारी पदभार स्वीकारून कामकाज सुरू केले होते. त्यांच्यावरच शाईफेक झाल्याने जिल्ह्यातील वातावरण आणखी गढूळ झाले आहे..Agriculture Office Misconduct: अकोल्यातील घटनेचा कृषी राजपत्रित अधिकारी संघटनेकडून निषेध.घटनेनंतर जिल्ह्यातील कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. अज्ञात व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. शाईफेक, शिवीगाळ, धक्काबुक्की, धमक्या आदी प्रकारांमुळे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना काम करणे कठीण झाले असून, सर्वांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. .दरम्यान, कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे विभागाच्या कामकाजावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. याबाबत साळवे यांच्याशी संपर्क साधला असता, ‘‘मी याप्रकरणी रीतसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे,’’ असे त्यांनी सांगितले..दृष्टीक्षेपात...कृषी निविष्ठा गैरव्यवहार प्रकरणी १४ कृषी अधिकारी निलंबितदोघांविरुद्ध विभागीय चौकशी सुरूप्रभारी एसएओ राजेंद्र साळवे यांच्यावर शाईफेकघटनेच्या निषेधार्थ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलनअज्ञात व्यक्तींवर कठोर कारवाईची मागणी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.