Wetland Conservation : पाणथळ जागांच्या संवर्धनासाठी झटणारी संस्था

Wetland Management : स्थानिकांमध्ये पाणथळ जागांबाबत जनजागृती करणे, त्यांच्यामध्ये त्याविषयी आपुलकी करणे इथेच न थांबता त्या संदर्भातील जीवन शिक्षण विद्यापीठच उभे करण्यात स्यमंतक संस्था आणि त्याचे प्रवर्तक सचीन आणि मिनल देसाई यशस्वी ठरले आहेत.
Wetland Conservation
Wetland ConservationAgrowon
Published on
Updated on

Dhamapur Lake Biodiversity :

पाणथळ जागा कशाला म्हणतात?

पाणथळ जागा (वेटलॅंड) म्हणजे स्थिर आणि उथळ पाण्याच्या जागा होय. येथे पाणी अल्पकाळ वा दीर्घकाळ साठून राहते. यातील उथळ हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, कारण त्यामुळेच पाणथळ जागा या तलाव किंवा धरणाच्या पाण्यापासून वेगळ्या ठरतात. हे पाणी उथळ असल्यामुळे सूर्यप्रकाश तळापर्यंत पोहोचतो. यात वनस्पतींची वाढ सुलभ होते. पाणथळ परिसंस्थेची प्राथमिक उत्पादकता पृथ्वीवरच्या अन्य सर्व परिसंस्थांमध्ये सर्वाधिक आहे.

प्राथमिक उत्पादकता म्हणजे काय?

उपलब्ध सूर्यप्रकाश, पाणी आणि कार्बन डायऑक्साइड वापरून प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे ग्लुकोज तयार होतो. म्हणजेच तिथे सेंद्रिय पदार्थाची निर्मिती होते. पाणथळ परिसंस्थेची उत्पादकता ही वार्षिक अडीच हजार ग्रॅम कॅलरी प्रति वर्ग मीटर असते, तर पानगळीची जंगलाची प्राथमिक उत्पादकता १००० ते १२०० ग्रॅम कॅलरी प्रति वर्ग इतकी असते. वाळवंटाची उत्पादकता फक्त तीन ते सहा ग्रॅम कॅलरी प्रति वर्ग इतकीच असते.

पाणथळ जागांचा ऱ्हास

पाणथळ जागांना अतिक्रमणाचा मोठा धोका आहे. अनेक ठिकाणी पाणथळ जागावर भर घालून त्या जागेचा वापर शेती व घर बांधणीसाठी सुरू आहे. काही उथळ तळ्यांच्या काठी धार्मिक स्थळे बांधली जातात. मग वाढती वर्दळ, उत्सव, यात्रा, जत्रा यामुळे तिथे कचऱ्याचे प्रमाण वाढत जाते. परिसरातील शेतपरिसरातून वाहत येणारे पाणी अतिरीक्त खते व कीडनाशकांचे अंश घेऊन येते. त्याचे विपरीत परिणाम या परिसंस्थेवर होत आहेत. अनेक ठिकाणी खाणकाम या पाणथळ स्थळांच्या मुळावर आले आहेत.

निरोगी पाणथळ जागा कार्बन आणि पाणी दोन्ही साठवतात. शिवाय पृथ्वीवरील एकूण जैवविविधतेपैकी सुमारे ४० टक्के जैवविविधतेला आधार देण्याचे काम करतात. मात्र १९०० ते २००० या शतकामध्ये शेती परिवर्तन, शहरे आणि धरणे बांधणे यासाठी जगाने जवळजवळ ६६ टक्के वेटलँड गमावले किंवा संपवले आहेत.

Wetland Conservation
Wetland Conservation : लोकसहभागातून धामापूर तलावाचे संरक्षण

पाणथळ संवर्धनासाठी जन चळवळ

गेली अनेक वर्षे सचिन देसाई आणि त्यांची स्यमंतक ही संस्था वनखाते व अन्य काही विभागांसोबत पाणथळ जागांच्या संरक्षण, संवर्धनाची मोहित राबवत आहे. त्यांच्या संयुक्त प्रयत्नातून धामापूर परिसरातील जंगलातील जैवविविधतेचे मूल्यमापन सुरू आहे.

उदा. या जंगलातून किती कोटी रुपयांचा प्राणवायू मिळतो? किती कोटी लिटर पाण्याचे संवर्धन होते? त्यातून किती हेक्टर जमिनीला पाणी मिळते? त्यातून किती उत्पन्न निघते? यात शोषला जाणाऱ्या कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण आणि मूल्यमापन अशा अनेक आघाड्यांवर अभ्यास आणि मांडणी केली जात आहे.

एक मसाल्याचे झाड वर्षाला इतके रुपयाची उत्पन्न देते, तर जंगलातील एकूण मसाल्याची झाडे व त्यांच्यापासून मिळू शकणारे उत्पन्न, अशा अनेक बाजूंनी मिळून गावाच्या जंगलाचे, तलावाचे, पठाराचे एकूण मूल्य काढले जात आहे. यातून सामान्यातील सामान्यांनाही आपल्या परिसरातील जल, जंगल, लहानमोठे सजीव आणि जमीन या सर्वांचे नैसर्गिक मूल्य समजू शकते. कारण पैशाची भाषा सामान्यांनाही चांगली कळते.

निसर्गात प्रत्येक घटक कसा महत्त्वाचा आहे, हे सांगताना सचिन देसाई म्हणतात, की निसर्ग संपत्तीचे मूल्यमापन करताना आपण फार वरव विचार करतो. तरस नावाचा श्‍वानवंशीय प्राणी छोट्या-मोठ्या प्राण्यांना हाडासकट खाऊन पचवतो. त्यांच्या विष्ठेत मोठ्या प्रमाणात उच्च प्रतीचे कॅल्शिअम असते, ते अन्य झाडांना आपोआप उपलब्ध होते.

धामापूर तलावातील जैवविविधता वाचविण्यासाठी सचिन देसाई व त्यांची पत्नी मीनल यांनी स्यमंतक संस्थेच्या माध्यमातून लक्षणीय काम केले आहे. स्वतः उच्चशिक्षित असलेले सचिन देसाई यांचे कुटुंब संपन्न होते. त्यांचे आजोबा महाराष्ट्रात माजी दंडाधिकारी न्यायाधीश होते. धामापूरचा तलाव बांधण्यात ५०० वर्षांपूर्वी देसाईंच्या पूर्वजांचा पुढाकार होता.

या आपल्या वंशपरंपरागत वैभवाला जपण्यासाठी आजोबांच्या आग्रहाखातरच सचिन आणि मीनल यांनी तीन वर्षांच्या कन्येला घेन भोपाळ सोडले. ते धामापूरला आले आणि या परिसरालाच आपले घर मानले. येथील लोक, परंपरा, जैव समृद्धी यांच्या संवर्धनाचे काम सुरू कले.

सुरुवातीचा काळ कसोटीचा होता. ही बाहेरून आलेल्या व्यक्तीवर लोकांचे विश्‍वास बसत नव्हता. यांचा काहीतरी स्वार्थ असेल, या भावनेने लोक कोणत्याही कामामध्ये आडकाठी करत, मानहानी करत. पण सचिन यांनी आपला निश्‍चय ढळू दिला नाही. पुढे ते अशा गोष्टींने मानसिकदृष्ट्या आणखी कणखर होत गेले. त्यांनी धामापूरला महात्मा गांधींच्या ‘नई तालिम’ शिक्षण पद्धतीवर आधारित शाळा सुरू केली.

या शाळेच्या अभ्यासक्रम म्हणजे धामापूरच्या समस्या. पर्यावरण आणि भवताल हे तिथले गुरू. त्यातूनच स्वयंप्रेरणेने व कल्पनेने शाश्‍वत जीवनशैली साधणारी उत्तरे शोधणे हेच शिक्षण. आता ती शाळा न राहता ते ‘जीवन शिक्षण विद्यापीठ’ (युनिव्हर्सिटी ऑफ लाइफ) झाले आहे. इथे शोधली जाणारी उत्तरे ही धामापूर आणि सिंधुदुर्ग पुरती मर्यादित न राहता जगभरातील खेड्यांसाठी महत्त्वाची ठरत आहेत.

त्यातून शाश्‍वत जीवनाच्या दिशा खुल्या होत आहेत. इथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यानेच राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण आणि सर्वोच्च न्यायालयात धामापूर तलावाच्या याचिकेसाठी कायदेशीर दस्तऐवज तयार केले. त्याचे नाव मोहम्मद शेख व ॲड. ओंकार केणी. या विद्यापीठातल्याच मुलांनी स्थानिक झाडापासून विविध उत्पन्न उत्पादनांची निर्मितीचे तंत्रज्ञान विकसित केले. हे पदार्थ आता धामापूरची खास ओळख बनले आहेत.

पर्यटन हे केवळ मनोरंजन न राहता ज्ञानवर्धन व्हावे, यासाठी नव्या संकल्पना राबवल्या जात आहेत. येथील पर्यटकांमध्ये उच्चशिक्षित, संशोधकांची संख्या मोठी असते. त्यांना माहितीही तितकीच शास्त्रीय आधारावरील द्यावी लागते. त्यासाठी स्थानिक तरुणांना तयार केले जात आहे.

‘‘धामापुरातून एकही युवकाला रोजगारासाठी गावाबाहेर जाण्याची वेळ येऊ नये, मग तो कष्टकरी असो वा बुद्धिजीवी!’’ हा या संस्थेचा या विद्यापीठाचा मूळ हेतू साध्य होत आहे. सचिन देसाई आणि त्यांच्या जीवन शिक्षण विद्यापीठांने शाश्‍वत जगण्याचा वस्तूपाठच युवकांच्या समोर ठेवला आहे.

Wetland Conservation
Wetland Maharashtra : पाणथळ प्रदेशांच्या आकड्यावर तुमचे मत काय?

पाणथळ जागांचे महत्त्व

पाणथळ जागांच्या आजूबाजूच्या परिसरात भूजलात वाढ होते. हे भूजल दीर्घकाळ टिकतेही. त्यामुळे आसपासच्या विहिरी व बोअरवेलला पाणी वाढते. उन्हाळ्यापर्यंत हे पाणी टिकत असल्यामुळे शेती उत्पादनातही भर पडते.

पाणथळ जागा या सामान्यतः जमिनीवरून वाहणारे पाणी साठवतात, त्यामुळे पूर नियंत्रणास त्याची मदत होते.

पाण्यातील माती, प्रदूषित घटक, बायोमास हे अशा पाणथळ जागेत अडवले जाते. परिणामी, पुढे वाहणारे किंवा जमिनीत मुरणारे पाणी यामुळे शुद्ध स्वरूपात जाते. भूजलाची गुणवत्ता वाढते. पाणथळातील सूक्ष्मजीव प्रदूषक घटकांचे विघटन करतात. त्यांचे प्रदूषण मूल्य कमी होत जाते.

जमीन व पाणी यातील परिसंस्थेचा दुवा म्हणजे पानथळ. पाणथळ ही शास्त्रीय भाषेत डायनॅमिक इकोसिस्टिम आहे. फायटोप्लांट्स, झू प्लांट्स, शेवाळ, बुरशी, जलचर, कीटक, मासे, शंख, शिंपले, झुडपे, गवते, पान वनस्पती, पक्षी अशी समृद्ध अन्नसाखळी व समृद्ध जैवविविधता इथे असते. गवते, गवताचे बी, कीटक, फळे खायला असल्याने पक्षीही खूप असतात. हेच पक्षी आजूबाजूच्या पिकावरील कीड, फळ झाडावरील किडी खाऊन जगतात. परिणामी परिसरातील पिके व फळबागांचे किडीपासून रक्षण होते.

पाणथळ जागा जागतिक स्थानिक जलचक्रात महत्त्वाची भूमिका बजावतात.

कार्बन स्थिरीकरणासह विविध वैशिष्ट्यामुळे हवामान बदलाच्या संकटातही पाणथळ जागा अधिक सकारात्मक भूमिका बजावू शकतात.

उपजीविका, शाश्‍वत विकास, दारिद्र्य निर्मूलन या सर्व बाबतीत ही पाणथळ जागा महत्त्वाच्या ठरू शकतात.

सुरुवातीचा काळ कसोटीचा होता. ही बाहेरून आलेल्या व्यक्तीवर लोकांचे विश्‍वास बसत नव्हता. यांचा काहीतरी स्वार्थ असेल, या भावनेने लोक कोणत्याही कामामध्ये आडकाठी करत, मानहानी करत. पण सचिन यांनी आपला निश्‍चय ढळू दिला नाही. पुढे ते अशा गोष्टींने मानसिकदृष्ट्या आणखी कणखर होत गेले. त्यांनी धामापूरला महात्मा गांधींच्या ‘नई तालिम’ शिक्षण पद्धतीवर आधारित शाळा सुरू केली.

या शाळेच्या अभ्यासक्रम म्हणजे धामापूरच्या समस्या. पर्यावरण आणि भवताल हे तिथले गुरू. त्यातूनच स्वयंप्रेरणेने व कल्पनेने शाश्‍वत जीवनशैली साधणारी उत्तरे शोधणे हेच शिक्षण. आता ती शाळा न राहता ते ‘जीवन शिक्षण विद्यापीठ’ (युनिव्हर्सिटी ऑफ लाइफ) झाले आहे. इथे शोधली जाणारी उत्तरे ही धामापूर आणि सिंधुदुर्ग पुरती मर्यादित न राहता जगभरातील खेड्यांसाठी महत्त्वाची ठरत आहेत.

त्यातून शाश्‍वत जीवनाच्या दिशा खुल्या होत आहेत. इथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यानेच राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण आणि सर्वोच्च न्यायालयात धामापूर तलावाच्या याचिकेसाठी कायदेशीर दस्तऐवज तयार केले. त्याचे नाव मोहम्मद शेख व ॲड. ओंकार केणी. या विद्यापीठातल्याच मुलांनी स्थानिक झाडापासून विविध उत्पन्न उत्पादनांची निर्मितीचे तंत्रज्ञान विकसित केले. हे पदार्थ आता धामापूरची खास ओळख बनले आहेत.

पर्यटन हे केवळ मनोरंजन न राहता ज्ञानवर्धन व्हावे, यासाठी नव्या संकल्पना राबवल्या जात आहेत. येथील पर्यटकांमध्ये उच्चशिक्षित, संशोधकांची संख्या मोठी असते. त्यांना माहितीही तितकीच शास्त्रीय आधारावरील द्यावी लागते. त्यासाठी स्थानिक तरुणांना तयार केले जात आहे.

‘‘धामापुरातून एकही युवकाला रोजगारासाठी गावाबाहेर जाण्याची वेळ येऊ नये, मग तो कष्टकरी असो वा बुद्धिजीवी!’’ हा या संस्थेचा या विद्यापीठाचा मूळ हेतू साध्य होत आहे. सचिन देसाई आणि त्यांच्या जीवन शिक्षण विद्यापीठांने शाश्‍वत जगण्याचा वस्तूपाठच युवकांच्या समोर ठेवला आहे.

- सतीश खाडे, ९८२३०३०२१८,

(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ या पुस्तकाचे लेखक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com