Dhamani Dam : धामणी धरणात सव्वा टीएमसी पाणीसाठा

Kolhapur Water Storage : तीन तालुक्यांतील जनतेने गेली पंचवीस वर्षे पाहिलेले हिरवे स्वप्न यावर्षी धामणी धरणात पाणीसाठा झाल्याने पूर्णत्वाला जात आहे.
Dhamani Dam
Dhamani DamAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : तीन तालुक्यांतील जनतेने गेली पंचवीस वर्षे पाहिलेले हिरवे स्वप्न यावर्षी धामणी धरणात पाणीसाठा झाल्याने पूर्णत्वाला जात आहे. येथील जनतेने धामणी धरण पूर्ण करण्यासाठी संघर्ष केला. त्यामुळेच चाळीस गावांतील २५०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

यंदा धरणात सुमारे सव्वा टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती विस्तारीकरणाचा सपाटाच लावला आहे. कधी वन खात्याचा, कधी निधीची कमतरता, कधी पुर्नवसनाचा प्रश्न, न्यायालयीन प्रकरण तसेच सिंचन घोटाळ्यात एसआयटी चौकशी यांसह अनेक कारणांमुळे सातत्याने येथील धरणाचे काम रखडत गेले.

Dhamani Dam
Dhamani Dam : धामणी धरणात २० टक्के साठा शिल्लक

त्यामुळे मध्यंतरी लोकांनी मतदानावर बहिष्कार घातला. १३ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत मतदानावर बहिष्कार घालण्याचे ठराव शासनाला सादर केले होते. धामणी धरण रखडल्याने कार्यक्षेत्रातील गावांचा विकास खुंटला होता.

याची दखल घेत लोकप्रतिनिधी संपतराव पवार पाटील, आमदार विनय कोरे, स्व. पी. एन. पाटील, चंद्रदीप नरके, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, ए. वाय. पाटील यांनी धरण पूर्णत्वाला जाण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले.

त्यामुळे धरणाच्या कामासाठी ७८२ कोटींची प्रशासकीय मान्यता मिळाली. पहिल्या टप्प्यात २३४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. धामणी प्रकल्पाच्या कामास गती आली. यावर्षी धरणाच्या घळभरणीचे काम प्रत्यक्ष पूर्ण झाल्याने पाणी साठवणूक करण्यास सुरुवात झाली असून, सव्वा टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

Dhamani Dam
Dhamani Dam Level : धामणी धरणात ७१ टक्के पाणीसाठा

धरणात यावर्षी १.२९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. यामुळे पुढील वर्षीपासून कोरडवाहू शेतीत नगदी पिके शेतकरी घेण्याच्या प्रतीक्षेत आहेत. यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी जमीन सपाटीकरण करण्याचे काम सुरू केले आहे. राई परिसरात शेतकऱ्यांनी जमिनीचे सपाटीकरणाचे काम पूर्ण केले आहे.

ओलिताखालील येणारे क्षेत्र (हेक्टर)

गगनबावडा ८९०

पन्हाळा ९१०

राधानगरी ७००

एकूण २५००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com