Pune News: गुलाबाच्या काढणीनंतर टिकवण कालावधी तीन दिवसांपर्यंत वाढविण्यासाठी पुष्पसंशोधन संचालनालयाच्या (डीएफआर) संशोधनाला यश आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून यावर संशोधन सुरू होते. यामुळे देशांतर्गत बाजारपेठेसह निर्यातीसाठी फुलांचा टिकवण कालावधी वाढण्यास मदत होणार आहे. .टिकवण क्षमता वाढविण्यासाठी ‘डीएफआर फूल शक्ती’ (रोझ) या संशोधन उत्पादनाच्या विस्तारीकरणासाठी ‘डीएफआर’ आणि बंगळुरू येथील दि फ्लोरा डिझाइन संस्थेत सामंजस्य करार करण्यात आला आहे..Floriculture Crisis: फुलांना दर अन मागणीही मात्र अतिवृष्टीचे सावट .‘डीएफर’च्या नुकत्याच झालेल्या १६ व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमामध्ये हा करार करण्यात आला. या वेळी ‘डीएफआर’चे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद, ‘दी फ्लोरा’चे संचालक शशांक उपाध्याय आणि आयसरचे संचालक प्रा. सुनील भागवत यावेळी उपस्थित होते..Agriculture Research: जमिनीचे मूलभूत नैसर्गिक गुणधर्म जतन करणे गरजेचे; माजी कुलगुरू डॉ. भट्टाचार्य .तीन वर्षे संशोधन व यशस्वी प्रयोगहीऑनलाइन विक्रीद्वारे पुष्पगुच्छ वितरणास मोठ्या प्रमाणात मागणी आहे. संबंधित कंपनीद्वारे देशभरात पुष्पगुच्छ, फुलांचे डिझाइन वितरीत केले जाते..आयसीएआर-डीएफआर येथील डॉ. गणेश कदम, डॉ. बासित रजा, डॉ. तारकनाथ सहा, डॉ. प्रभा के., डॉ. शिवकुमार के. या शास्त्रज्ञांच्या टीमने तीन वर्षे संशोधन केले आणि विविध ठिकाणी यशस्वीरीत्या प्रयोग करून फॉर्म्युला तयार केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.