Developmental Transformation : गावाचा विकासात्मक कायापालट करावा

Vaibhav Waghmare : ‘‘ग्रामसेवक आणि ग्राम विकास अधिकारी हे खऱ्या अर्थाने गावाचे सेवक आहेत. त्यांनी गावाचा विकासात्मक कायापालट करावा,’’ असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी केले.
Zilla Parishad
Zilla ParishadAgrowon

Washim News : ‘‘ग्रामसेवक आणि ग्राम विकास अधिकारी हे खऱ्या अर्थाने गावाचे सेवक आहेत. त्यांनी गावाचा विकासात्मक कायापालट करावा,’’ असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या प्रांगणात जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक आस्थापना लिपिक, विस्तार अधिकारी व सर्व गट विकास अधिकाऱ्यांची सभा घेत अकरा कलमी कार्यक्रम दिला. त्यांनी गावाच्या विकासामध्ये ग्रामसेवकांची भूमिका किती महत्त्वाची आहे, याची जाणीव करून दिली.

Zilla Parishad
Nashik ZP : जि.प.समोर १२२ कोटी निधी खर्चाचे आव्हान

आवास योजना, पंचायत विकास निर्देशांक अशा बऱ्याचशा मानकांमध्ये ग्रामसेवकांनी चांगले काम केल्याची दखल घेत त्यांचे कौतुक करण्यात आले. सभेला पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांच्यासह सर्व गटविकास अधिकाऱ्यांची उपस्थित होते.

‘‘गावाचा विकास करायचा असेल तर प्रत्येक ग्रामसेवकांनी अकरा कलमी कार्यक्रमाचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. येथून पुढे आपला गोपनीय अहवाल लिहिताना त्याचे गुणांकन याच मुद्द्यांच्या अनुषंगाने होईल, असे सांगून नोकरी प्रिय असेल तर प्रामाणिकपणे काम करा, कामात कुचराई आणि दिरंगाई कदापिही खपवून घेतली जाणार नाही,’’ असा इशारा वाघमारे यांनी दिला.

Zilla Parishad
Raigad ZP : प्रदीर्घ प्रशासकीय कारभार

‘...तर कायम तुमच्या पाठीशी’

‘‘तुम्ही प्रामाणिकपणे आणि नियमानुसार काम करत असाल तर ग्रामसेवकांची सेवाविषयक प्रकरणे मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध असेन. प्रामाणिकपणे काम करताना तुमच्यावर दबाव आला तर मी अभेद्य‍ भिंत बनून खंबीरपणे उभा राहीन,’’ असे आश्‍वासन श्री. वाघमारे यांनी ग्रामसेवकांना दिले.

ग्राम विकासासाठी अकरा कलमी कार्यक्रम

ग्रामसेवकांच्या उपस्थितीबाबत वेळापत्रक

वेळापत्रकाचे काटेकोर पालन

व्यवस्थित ग्रामसभा घेणे

ग्रामपंचायत कार्यालय जिवंत करणे

१०० टक्के कर वसुली

पूर्णपणे भ्रष्टाचार मुक्त प्रशासन

नियमांना आणि लोकहिताला धरून काम करणे

गावातील शासकीय कार्यालयांवर नियंत्रण ठेवणे

मंगळवार तसेच गुरुवारच्या दिवसभराच्या कामाचे नियोजन

स्वयंप्रेरणेंनी नागरिकांना सेवा देणे

प्रत्येक वर्षामध्ये किमान तीन उल्लेखनीय कामे करणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com