Devsthan Inam Land : देवस्थान इनाम जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करावी, कोल्हापुरात मोर्चा

Land Law : जमीन आमच्या हक्काची... आमच्या मागण्या मान्य करा... आदी घोषणांनी मोर्चा मार्ग दणाणून गेला.
Devsthan Inam Land
Devsthan Inam Landagrowon
Published on
Updated on

Devsthan Jamin : देवस्थान इनाम जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करावी, यासह अन्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून निवड झालेल्या गडहिंग्लज तालुक्याच्या प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. प्रांत कार्यालयाच्या आवारात शेतकऱ्यांनी सुमारे तासभर ठिय्या मारला. अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले.

जमीन आमच्या हक्काची... आमच्या मागण्या मान्य करा... आदी घोषणांनी मोर्चा मार्ग दणाणून गेला. मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती. आंदोलकांनी प्रांत कार्यालयाच्या आवारातच ठिय्या मारला. या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.

यावेळी डॉ. उदय नारकर म्हणाले, 'देवस्थानच्या जमिनी कायमस्वरुपी शेतकऱ्यांच्या नावावर करण्याचा कायदा करतो, असे आश्वासन महसूल मंत्र्यांनी दिले होते. मात्र, त्याकडे लक्ष देण्यासही यांना वेळ नाही. याबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही, तर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर मोर्चा काढण्यात येईल.

शिवाजी गुरव म्हणाले, 'आम्ही करणारी जमीन देवाची आहे. शासनाने आमची इतर हक्कातील नावे गायब केली आहेत. राज्यकर्ते देवापेक्षा मोठे आहेत का? शेतकऱ्यांची नावे पूर्वीप्रमाणे ताबडतोब लावावीत. इतर राज्यात अशा पद्धतीने प्रक्रिया राबविली आहे. लक्ष्मण पाच्छापुरे, संग्राम सावंत, अँड. दशरथ दळवी, अमोल नाईक यांचीही भाषणे झाली.

Devsthan Inam Land
Farmer Land Law : वर्ग २ जमीन वर्ग १ होण्यास मान्यता, खंडकरी शेतकऱ्यांना दिलासा

दरम्यान, आंदोलकांच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांची भेट घेतली. त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. अखिल भारतीय किसान सभेचे कार्यकतें, शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते.

या मागण्यांसाठी आंदोलन

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कर्जमाफी करा, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्या, देवस्थान इनाम जमीन कसणायांच्या नावे करा खंडापोटी अवाजवी रक्कम वसूल करू नये, कसणाऱ्या शेतकन्यांची नावे सातबाराला अद्ययावत करावीत, देवस्थान जमीन कसणाऱ्यांना शेतकऱ्यांना त्रास देऊ नये, पीक कर्ज व मध्यम मुदतीचे कर्ज मिळावे जलमापक यंत्राची सक्ती रद्द करावी, धरणांमधील पाण्याचे योग्य नियोजन करावे या मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com