Maharashtra Home Guard : होमगार्ड्सना राज्य शासनाचे मोठे गिफ्ट; मानधनात दुप्पट वाढ, आता प्रतिदिन मिळणार १०८३ रुपये

Increase in Salary of Home Guards : राज्यातील होमगार्डांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय १ तारखेच्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. आता याबाबत शासन निर्णय काढल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
Maharashtra Home Guard
Maharashtra Home GuardAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यातील होमगार्डांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय १ ऑक्टोंबरला राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. याबाबत शासन निर्णय काढण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. फडणवीस यांनी होमगार्डांच्या मानधनात भरीव वाढ केली असून प्रतिदिन ५७० वरून १०८३ रुपये केल्याची माहिती ट्विट करत फडणवीस यांनी दिली आहे.

राज्यातील होमगार्डांच्या भत्त्यात भरीव वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाचा लाभ राज्यातील ४० हजार होमगार्डंना होईल असा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला होता. तर ही वाढ कर्तव्य भत्यांपासून ते भोजन भत्त्यांपर्यंत सर्व भत्यांमध्ये केली जाईल, असेही सांगण्यात आले होते.

Maharashtra Home Guard
Dhananjay Munde : सत्तर अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी कृषिमंत्र्यांचे आयुक्तांना आदेश

यानिर्णयाप्रमाणे राज्य शासनाकडून ९ ऑक्टोंबर रोजी राज्यातील होमगार्ड्सचे मानधन जवळजवळ दुप्पट करण्यासंबंधीचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. या शासन आदेशात होमगार्ड्सचे मानधन प्रतिदिन ५७० वरून १०८३ रुपये करण्यात आले आहे.

यावरून फडणवीस यांनी, होमगार्ड्सच्या मानधनात जवळपास दुप्पट वाढ करण्यात आली आहे. हे मानधन देशात सर्वाधिक असल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. याशिवाय विविध भत्त्यांची रक्कम सुद्धा दुप्पट करण्यात आली आहे. उपहार भत्ता १०० वरून २०० रुपये तर भोजन भत्ता १०० वरून २५० रुपये इतका करण्यात आल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

तसेच राज्यातील सुमारे ५५ हजार होमगार्डना या निर्णयाचा लाभ मिळेल. १ ऑक्टोबर २०२४ पासून ही वाढ देण्यात येईल, अशीही माहिती फडणवीस यांनी दिली आहे. तर गेल्याच महिन्यात सुमारे ११ हजार २०७ होमगार्ड्सची भरती प्रक्रिया सुद्धा पूर्ण करण्यात आली आहे. सध्या त्यांचे प्रशिक्षण करण्यात येते असून सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com