Loss of orange crop : वरुड परिसरातील संत्रा गळतीचे दुसऱ्या टप्प्यातही पंचनामे करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Deputy Chief Minister Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यासह विदर्भात दमदार पाऊस होत आहे. ज्यामुळे अमरावती जिल्ह्यात संत्रा पिकाला मोठा फटका बसला आहे.
Ajit Pawar
Ajit PawarAgrowon
Published on
Updated on

Pune News : गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यातच गेल्या महिन्यात अतिवृष्टीमुळे अमरावती जिल्ह्यासह विदर्भातील संत्रा फळबागांना मोठा फटका बसला. येथे संत्रा फळबागांना अतिवृष्टी पावसामुळे गळती लागल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यावरून संत्रा पिकाच्या नुकसान भरपाईचे पंचनामे तातडीने करावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (ता.१) दिले. ते वरुड तालुक्यातील नवासा पार्डी येथे संत्रा पिकाच्या नुकसानीची पाहणी करत होते. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार देवेंद्र भुयार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते उपस्थित होते.

सध्या मराठवाड्यासह विदर्भात पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्यातही अमरावतीत पावसाची संततधार होती. यामुळे संत्रा बागांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला. तर अतिवृष्टीमुळे संत्रा गळती झाली. यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला. वरुड परिसरातही संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यावेळी अजित पवार यांनी वरुड तालुक्यातील नवासा पार्डी येथील ज्ञानेश्वर मोघे यांच्या शेतातील संत्रा बागेला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.

Ajit Pawar
Ajit Pawar Onion : अजित पवारांनी कांदा उत्पादकांची मागितली माफी; म्हणाले, लोकसभेला कंबर मोडलं...

वरुड परिसरात गेल्या कालावधीमध्ये पावसामुळे संत्रा पिकाचे मोठे नुकसान झाले असून यामुळे संत्रा बहाराचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या नुकसानीची तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना विम्याची मदत मिळावी, यासाठी सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना अजित पवार यांनी यावेळी दिल्या.

तसेच पहिल्या टप्प्यातील पंचनामे झाले असले तरी शेतकऱ्यांचे नुकसान जादा झाले आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातही पंचनामे करून तातडीने मंत्रालयस्तरावर नुकसानीचा प्रस्ताव सादर करावे असेही आदेश अजित पवार यांनी यावेळी दिले आहेत. तर शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी योग्य ते सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिले. यावेळी अजित पवार यांनी शेतकऱ्यांनी जनावरांसाठी हिरवा चारा उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना पुढे येण्याचे आवाहन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com