Jalna District Annual Plan : जालना जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत विविध विभागांकडून राबविण्यात येणाऱ्या कामांचा मासिक आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या वेळी जिल्हाधिकारी मित्तल यांनी राज्यस्तरीय यंत्रणांच्या विभाग प्रमुखांनी फेब्रुवारी २०२६ पर्यंत प्रस्तावित कामांचे सविस्तर नियोजन करून प्रत्यक्ष अंमलबजावणीस सुरुवात करण्याचे निर्देश दिले..जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२५-२०२६ मासिक प्रगती अहवाल आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. .District Annual Plan : जळगाव जिल्हा वार्षिक योजनेस अतिरिक्त ७० कोटींची वाढ.बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी सुचित कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, जिल्हा कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, जिल्हा रेशीम अधिकारी अजय मोहिते, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता पवार, नियोजन विभागाचे अमोल तोंडे यांच्यासह संबंधित राज्यस्तरीय यंत्रणांचे विभाग प्रमुख उपस्थित होते..District Annual Plan : वार्षिक योजनेचा निधी पूर्ण खर्च करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे : चंद्रकांत पाटील.जिल्हा वार्षिक योजनेतील निधी वेळेत व परिणामकारक पद्धतीने खर्च होणे आवश्यक असून, मंजूर कामांमध्ये अनावश्यक विलंब होऊ नये, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक विभागाने आपल्या योजनेतील कामांचा कालबद्ध कृती आराखडा तयार करून प्रगती अहवाल सादर करावा. .तसेच प्रलंबित कामांबाबत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या बैठकीत कृषी, पशुसंवर्धन, आरोग्य, मत्स्य व्यवसाय, बांधकाम, वनीकरण, प्रादेशिक परिवहन, लघु पाटबंधारे, अपारंपरिक ऊर्जा विभाग, आयटीआय यासह अन्य राज्यस्तरीय यंत्रणांच्या कामांचा आढावा घेण्यात आला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.