Solapur News: ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना’ची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आली असली, तरी ग्रामपंचायत कर वसुलीतील ५० टक्के सवलतीची मुदत मात्र वाढवण्यात आलेली नाही. ही मुदतही मार्च अखेरपर्यंत वाढवून मिळावी, अशी मागणी सरपंच परिषदेच्या वतीने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे..शासनाने समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत ३१ डिसेंबरपर्यंत कर वसुलीत ५० टक्के सवलत दिली होती. या सवलतीमुळे राज्यातील ग्रामपंचायतींच्या कर वसुलीला मोठा प्रतिसाद मिळाला आणि महसुलात वाढ झाली. मात्र, ही सवलत आता संपल्याने वसुलीचा वेग मंदावला आहे..Gram Panchayat : ग्रामपंचायत कर्मचारी प्रश्नांवर १५ दिवसांत तोडगा काढणार.अभियानाची मुदत ३१ मार्चपर्यंत असल्याने, कर सवलतीलाही ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिल्यास ग्रामपंचायतींचा १०० टक्के कर वसूल होण्यास मदत होईल, असे सरपंच परिषदेने म्हटले आहे. ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांच्या वीजबिलांबाबतही परिषदेने महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत, त्यात २०२२ पूर्वीची वीजबिल वसुली स्थगित करण्यात आली होती..Gram Panchayat: कोल्हापुरात ३५ ग्रामपंचायतींना दुसऱ्यांदा पिवळे कार्ड.त्यानंतर महामंडळाने बिलांची मागणी केली नाही, समृद्ध पंचायतराज अभियानात वीजबिल थकबाकी नसल्यास ग्रामपंचायतींना विशेष गुणांक दिले जातात. जर २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षांच्या वीजबिलात ५० टक्के सवलत दिली, तर अनेक ग्रामपंचायती ही थकबाकी एकरकमी भरण्यास तयार आहेत..जिल्हा परिषद प्रशासन आणि वीज महामंडळाने समन्वय साधून वीजबिल सवलतीबाबत मार्ग काढावा, जेणेकरून ग्रामपंचायतींना देयके भरण्यास प्रोत्साहन मिळेल, अशी भूमिका सरपंच परिषदेचे राज्य उपाध्यक्ष ॲड. विकास जाधव, जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख आणि महिला जिल्हाध्यक्षा कविता घोडके-पाटील यांनी मांडली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.