Seed Demand : खरिपासाठी ६७ हजार ७१२ क्विंटल बियाण्यांची मागणी

Demand to Seed Producers : यंदाच्या खरिपासाठी विविध पिकांचे ६७ हजार ७१२ क्विंटल बियाणे व कपाशी बियाण्याच्या १० लाख ८३ हजार ५०० पाकिटांची मागणी बियाणे उत्पादकांकडे करण्यात आली आहे,
Seed Demand
Seed DemandAgrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यात आगामी (२०२४) खरीप हंगामात ४ लाख ९५ हजार २९० हेक्टर क्षेत्रावर पेरणी प्रस्तावित आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना बियाण्यासह अन्य निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात यासाठी कृषी विभागातर्फे नियोजन केले जात आहे. यंदाच्या खरिपासाठी विविध पिकांचे ६७ हजार ७१२ क्विंटल बियाणे व कपाशी बियाण्याच्या १० लाख ८३ हजार ५०० पाकिटांची मागणी बियाणे उत्पादकांकडे करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी तथा प्रभारी जिल्हा कृषी विकास अधिकारी दीपक सामाले यांनी दिली.

परभणी जिल्ह्यात खरिपात सोयाबीन, कपाशी, तूर ही प्रमुख नगदी पिके आहेत. अलीकडील काही वर्षांत जिल्ह्यातील सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे. जिल्ह्यात २०२१ ते २०२३ या तीन वर्षांतील सोयाबीनचे सरासरी क्षेत्र २ लाख ५४ हजार ५६५ हेक्टर आहे. या तीन वर्षांत सरासरी ६३ हजार ८४८ क्विंटल सोयाबीन बियाण्याची विक्री झाली. यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनची २ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी प्रस्तावित आहे. त्यासाठी १ लाख ६८ हजार ७५० क्विंटल बियाण्याची गरज असेल. प्रस्तावित बियाणे बदलाचे प्रमाण ३५ टक्क्यांनुसार ५९ हजार ६३ क्विंटल बियाण्याची गरज असेल.

Seed Demand
Seed Demand : साताऱ्यात रब्बीसाठी ३२ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी

गतवर्षीच्या (२०२३) खरिपातील ग्रामबीजोत्पादन मोहिमेद्वारे तसेच शेतकऱ्यांनी स्वतःकडील राखून ठेवलेले मिळून एकूण १ लाख ९ हजार ६८७ क्विंटल बियाणे उपलब्ध होऊ शकेल. त्याव्यतिरिक्त ५९ हजार ६३ क्विंटल बियाण्याची मागणी सार्वजनिक क्षेत्रातील आणि खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांकडे करण्यात आली आहे.

त्यात महाबीजकडील १५ हजार क्विंटल, राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडील ५ हजार क्विंटल आणि खासगी कंपन्यांकडील ३९ हजार ६३ क्विंटल बियाण्याचा समावेश आहे. कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी, मका, तीळ आदी पिकांचे प्रस्तावित पेरणी क्षेत्र २ लाख ७० हजार २९० हेक्टर आहे. त्यात ज्वारी ४ हजार ७०० हेक्टर, बाजरी ५०० हेक्टर, मका १००० हेक्टर, तूर ४५ हजार ६४० हेक्टर, मूग १६ हजार हेक्टर, उडीद ५ हजार हेक्टर, तीळ २५० हेक्टर पेरणी तसेच कपाशी १ लाख ९७ हजार हेक्टर लागवडीत समावेश आहे.

त्यासाठी ‘महाबीज’कडे २ हजार २७५ क्विंटल आणि खासगी क्षेत्रातील बियाणे उत्पादकांकडे ६ हजार ३७४ क्विंटल, असे एकूण ८ हजार ६४९ क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यात ज्वारीचे ३५३ क्विंटल, बाजरीचे १५ क्विंटल, मका १५० क्विंटल, तूर २ हजार ३९६ क्विंटल, मूग ५२८ क्विंटल, उडीद २७३ क्विंटल, तीळ ३ क्विंटल, कपाशी ४ हजार ९२५ क्विटंल व इतर पिकांच्या ६ क्विंटल बियाण्याचा समावेश आहे.

Seed Demand
Vegetable Seed Industry : भाजीपाला बियाणे क्रांतीची दिशा
बाजारभावात मंदी असल्यामुळे जिल्ह्यात आगामी खरिपात सोयाबीनच्या क्षेत्रात काही अंशी घट होण्याची शक्यता आहे. कपाशीच्या क्षेत्रात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. प्रस्तावित पेरणी क्षेत्रानुसार विविध पिकांच्या बियाण्याची मागणी करण्यात आली आहे.
दीपक सामाले, मोहीम अधिकारी तथा प्रभारी जिल्हा कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, परभणी

कपाशीच्या १० लाखांवर बियाणे पाकिटांची मागणी...

कपाशीचे प्रस्तावित लागवड क्षेत्र १ लाख ९७ हजार हेक्टर आहे. बी.टी. कपाशी लागवड करताना दोन झाडांतील अंतर कमी करण्याचा शेतकऱ्यांचा कल आहे. प्रस्तावित क्षेत्रासाठी कपाशीच्या विविध वाणांच्या १० लाख ८३ हजार ५०० बियाणे पाकिटांची मागणी करण्यात आली आहे, असे श्री. सामाले व कृषी अधिकारी शंकर बलशेटवार यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com