Water Scarcity Impact on Agriculture: अकोला जिल्ह्यात यंदा मान्सूनच्या आगमनास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. सिंचनाची सुविधा उपलब्ध असलेल्या भागांमध्ये शेतकऱ्यांनी केळी रोप कपाशी ,पेरणी पूर्ण केली असली, तरी पावसाअभावी पिकांच्या वाढीसाठी पाण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी विहीर, बोअरवेल आणि इतर सिंचन साधनांच्या माध्यमातून पिकांना पाणी देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र,विज पुरवठा मिळत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत..कापूस, सोयाबीन, तूर यासह विविध खरीप पिकांची पेरणी झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात ओलावा टिकून राहणे आवश्यक असते. मात्र पाऊस लांबल्याने जमिनीतील आर्द्रता कमी होत असून पिके कोमेजण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे सिंचनावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची धावपळ वाढली आहे..Monsoon Delay Issue: पावसाअभावी खरीप नियोजन विस्कळित.दरम्यान, सिंचनासाठी विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असतानाही अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांना पुरेसा व नियमित वीजपुरवठा मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. वारंवार होणारा खंडित वीजपुरवथा आणि अपुरा वेळ यामुळे पिकांना आवश्यक तेवढे पाणी देणे कठीण होत आहे..Monsoon Delay Impact: मॉन्सूनच्या पावसाअभावी उन्हाचा चटका तापदायक.परिणामी शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. केळी उत्पादक सचिन कोरडे यांचे म्हणणे आहे की, पावसाच्या अनिश्चिततेमुळे आधीच शेतीचा खर्च वाढला आहे. अशा परिस्थितीत सिंचनासाठी अखंड आणि नियोजित वीजपुरवठा मिळणे अत्यंत आवश्यक आहे..अन्यथा पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. वीज विभागाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांना पुरेसा वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.