Kharif Season: यंदाच्या खरीप हंगामात मॉन्सूनच्या उशिरा झालेल्या आगमनाचा सर्वाधिक फटका भूम तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल वीस दिवस उशिरा पावसाने हजेरी लावल्याने खरीप पेरणीचे संपूर्ण नियोजन विस्कळित झाले असून, अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या अद्याप रखडल्या आहेत. .काही भागात अत्यल्प रिमझिम पावसावर कोरडी पेरणी करण्यात आली असली तरी अपुऱ्या ओलाव्यामुळे उगवण समाधानकारक झाली नसल्याने अनेकांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे..यंदा जून महिना जवळपास कोरडाच गेल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत राहिले. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामाबाबतची चिंता आणखी वाढली आहे..Kharif Sowing Delay: अकोला जिल्ह्यात पावसाअभावी पेरण्या रखडल्या.काही शेतकऱ्यांनी धोका पत्करून सोयाबीनची पेरणी केली. उगवण झाली असली तरी पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेला दमदार पाऊस अद्याप झालेला नाही. परिणामी, पिकांची वाढ खुंटण्याची भीती व्यक्त केली जात आहे..भूम तालुक्यात खरीप हंगामात प्रामुख्याने सोयाबीनची लागवड केली जाते. त्यासोबत उडीद, तूर, मूग आणि मका या पिकांच्याही पेरण्या होतात. मात्र, यंदा पावसाअभावी तालुक्यातील ६० हजार ४५० हेक्टर सरासरी पेरणी क्षेत्रापैकी केवळ ३० हजार ८६८ हेक्टर (सुमारे ५१ टक्के) क्षेत्रावरच पेरणी पूर्ण झाली आहे..Kharif Sowing Delay: अकोला जिल्ह्यात पावसाअभावी पेरण्या रखडल्या.उर्वरित जवळपास निम्मे क्षेत्र अद्याप पेरणीच्या प्रतीक्षेत आहे. झालेल्या पेरणीमध्ये सोयाबीन २८ हजार ६९९ हेक्टर, उडीद ८४६ हेक्टर, तूर ७३५ हेक्टर, मका ३६८ हेक्टर आणि मूग २२० हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात काही भागात रिमझिम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे..पाथरूड, वालवड, ईट, माणकेश्वर आणि देवळाली परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली असून, काही ठिकाणी उगवण चांगली झाली आहे. पण सततच्या हलक्या पावसामुळे तणनियंत्रण, खते देणे आणि इतर आंतरमशागतीची कामे रखडली आहेत. दुसरीकडे अनेक गावांमध्ये अद्यापही पुरेसा पाऊस नसल्याने पेरणीच झालेली नाही, तर काही ठिकाणी वापसा नसल्यामुळे शेतकरी शेतात उतरू शकलेले नाहीत.अत्यल्प पावसामुळे जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झालेला नाही. त्यामुळे अनेक शेतकरी पेरणी करण्याचे धाडस करीत नाहीत. ज्यांनी अत्यल्प पावसावर पेरणी केली, त्या शेतकऱ्यांना उगवण कमी झाल्याने पुन्हा बियाणे आणि मशागतीवर खर्च करण्याची वेळ येत आहे. यामुळे आधीच वाढलेल्या उत्पादन खर्चात आणखी भर पडत असून बळिराजाची आर्थिक चिंता वाढली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.