Pune News: धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सोळा दिवस जालना शहरात उपोषण करणारे दीपक बोऱ्हाडे यांनी गुरुवारी (ता.२) प्रकृती खालावल्याने उपोषण तात्पुरते थांबवले. सहकाऱ्यांच्या आग्रहाखातर त्यांनी आपल्या मुलीच्या हस्ते फळांचा रस घेऊन उपोषण सोडले. मात्र, आरक्षणाचा लढा आणि शासनाशी चर्चा सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी शासनाने तोडगा काढावा, अन्यथा पुन्हा आंदोलनाची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले..उपोषणाची पार्श्वभूमीबोऱ्हाडे यांनी जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात आपले उपोषण सुरू केले होते. बुधवारच्या (ता.१) रात्रीपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. डॉक्टरांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला होता. या परिस्थितीत त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना उपोषण थांबवण्याची विनंती केली. अखेर त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी उपोषण तूर्त स्थगित केले आणि उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल झाले..Dhangar Reservation: आरक्षणासाठी धनगरांचा एल्गार! मुंबईत धनगरांचा मोर्चा दाखल.बैठक आणि पुढील दिशाउपोषणस्थळी गुरुवारी राज्यभरातील अभ्यासक आणि त्यांच्या निवडक सहकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात आली. बैठकीदरम्यान बोऱ्हाडे भावनिक झाले. ते म्हणाले, "आम्ही हार मानलेली नाही..शासनाने आम्हाला वेळ मागितला आहे, आणि आम्ही तो देऊ. धनगर समाजाने गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणासाठी वाट पाहिली आहे. आता आणखी एक महिना थांबू, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी शासनाने यावर तोडगा काढावा. अन्यथा, आम्ही पुन्हा लढ्यासाठी सज्ज होऊ.".Dhangar Reservation : जालन्यात धनगर आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक.बैठकीत समाजबांधवांनी आंदोलनाला अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला. काहींनी मुंबईत जाऊन आंदोलन करण्याचा प्रस्ताव मांडला, तर यावर डॉ. प्रा. यशपाल भिंगे यांनी दिल्लीत जाऊन "पिवळे वादळ" निर्माण करण्याचा सल्ला दिला..भिंगे म्हणाले की, बोऱ्हाडे यांच्या आंदोलनाची लाट ओडिशा, बिहार, उत्तराखंड, दिल्ली आणि अगदी नेपाळपर्यंत पोहोचली आहे. त्यांनी समाजबांधवांना प्रमाणपत्र नाही तर मतदान नाही" असा निश्चय करण्याचे आवाहन केले. बोऱ्हाडे यांनीही सांगितले की, त्यांना दिल्लीतून आंदोलनासाठी निमंत्रण मिळाले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.