Summer Sowing : उन्हाळी पिकांच्या पेरणीत ७ हजार ९७९ हेक्टरने घट

Sowing Update : परभणी जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळी हंगामात ६ हजार ८८९ हेक्टरवर (६२.५८ टक्के) पेरणी झाली. गतवर्षी (२०२३) च्या १४ हजार ८६८ हेक्टर (१३४ टक्के) च्या तुलनेत यंदा उन्हाळी पेरणी क्षेत्रात ७ हजार ९७९ हजार हेक्टरने घट झाली आहे.
Summer Crop
Summer Crop Agrowon

Parbhani News : कृषी आणि महसूल विभाग यांनी संयुक्तरित्या यंदाच्या (२०२४) उन्हाळी हंगामातील पेरणी क्षेत्र नुकतेच अंतिम केले आहे.त्यानुसार परभणी जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळी हंगामात ६ हजार ८८९ हेक्टरवर (६२.५८ टक्के) पेरणी झाली. गतवर्षी (२०२३) च्या १४ हजार ८६८ हेक्टर (१३४ टक्के) च्या तुलनेत यंदा उन्हाळी पेरणी क्षेत्रात ७ हजार ९७९ हजार हेक्टरने घट झाली आहे. दुष्काळी स्थितीमुळे सिंचनासाठी पाणी नसल्यामुळे यंदा उन्हाळी पिकांच्या पेरणीत मोठी घट झाली आहे.

जिल्ह्यात उन्हाळी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र ११ हजार ०८ हेक्टर आहे. उन्हाळी भुईमूग, बाजरी, मका पारंपारिक पिके आहेत. परंतु मागील दोन तीन वर्षापासून सोयाबीन, मूग, तीळ आदी पिके घेतली जात आहेत. गतवर्षीच्या ८ हजार १० हेक्टरच्या तुलनेत यंदा भुईमुगाच्या क्षेत्रात ३ हजार ७८१ हेक्टरने घट झाली.

Summer Crop
Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

भुईमुगाच्या तालुकानिहाय क्षेत्रात परभणी तालुक्यातील ४५४.८० हेक्टर, जिंतूरमध्ये १ हजार ८५० हेक्टर, सेलूमध्ये १४१ हेक्टर, मानवतमध्ये २९८.३० हेक्टर, पाथरी तालुक्यातील १३९ हेक्टर, सोनपेठ तालुक्यातील ४७.२० हेक्टर, गंगाखेड तालुक्यातील ६५ हेक्टर, पालम तालुक्यातील ७० हेक्टर, पूर्णा तालुक्यातील १ हजार १६३ हेक्टरचा समावेश आहे.

सोयाबीनच्या क्षेत्रात गतवर्षीच्या ४ हजार हेक्टरच्या तुलनेत यंदा ३ हजार हेक्टरने घट झाली आहे. यंदा परभणी, जिंतूर, सेलू, पाथरी, सोनपेठ, पालम, पूर्णा सोयाबीनचा पेरा आहे. मुगाच्या गतवर्षी ३५ हेक्टरवर पेरणीच्या तुलनेत यंदा १५ हेक्टरने घट झाली. सर्वच तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा उन्हाळी बाजरीला पसंती दिल्यामुळे गतवर्षीच्या १ हजार ४६ हेक्टरच्या तुलनेत यंदा बाजरीच्या क्षेत्रात ८३९ हेक्टरने घट झाली.

Summer Crop
Summer Sowing : उन्हाळी पेरणी क्षेत्रात नऊ हजार हेक्टरने घट

तिळाच्या गतवर्षीच्या १४.९० हेक्टरच्या तुलनेत यंदा १.३ हेक्टरने वाढ झाली आहे. मक्याचे क्षेत्रात ६८ हेक्टरने वाढ झाली. यंदा पाथरी तालुक्यातील सुर्यफुलाची ५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यंदा उन्हाळी पिकांचा जिंतूर तालुक्यात सर्वाधिक तर गंगाखेड तालुक्यात सर्वात कमी पेरा आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल गवळी, तंत्राधिकारी (सांख्यकी) महादेव लोंढे यांनी दिली.

उन्हाळी हंगाम २०२४ पीकनिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

पीक सर्वसाधारण क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी

भूईमूग ६७९६ ४२२९ ६२.२४

सोयाबीन २६६२ १४११ ५२.९९

मूग ३२ २० ६१.७३

बाजरी १५० २०७ ४५७.१३

तीळ ११.२४ १६.२० १४४.१३

मका १३७७ ९३९ ६८.२४

उन्हाळी हंगाम तालुकानिहाय तुलनात्मक पेरणी स्थिती (हेक्टरमध्ये)

तालुका २०२२ २०२३ २०२४

परभणी ३१४१ २३५७ ६१५

जिंतूर ३३५६ ६३२३ २७४२

सेलू १४२६ ८४१ २१९

मानवत १८२४ ११६३ ५५८

पाथरी ९७२ ५४३ ४८५

सोनपेठ ७३१ ५६६ २३५

गंगाखेड ३५४८ ९७३ ८६

पालम ७२० २५७ २९५

पूर्णा २०४४ १८४२ १६५२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com