.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Panvel News : तालुक्यातील शंभर टक्के भातपेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यंदा समाधानकारक पाऊस पडल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. असे असले तरी तालुक्यातील शेतीचे प्रमाण कमी झाले आहे. पनवेलमध्ये २०२२मध्ये आठ हजार हेक्टरवर भातशेती लागवड झाली होती. २०२३मध्ये सात हजार हेक्टरच्या आसपास लागवड झाली होती; तर यंदा ६०२१.२८ हेक्टर क्षेत्रात भातलागवड झाली आहे. त्यामुळे मागील वर्षापेक्षा यंदा पीकपेरा कमी झाला आहे.
गेल्या काही वर्षांपासून अवकाळी तसेच अतिवृष्टीमुळे पिकांची हानी झाली होती; परंतु यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे. भात हे पनवेलच्या ग्रामीण पट्ट्यातील महत्त्वाचे पीक आहे. सुरुवातीपासूनच समाधानकारक पाऊस झाल्याने जूनच्या दुसऱ्या आठवड्यात भातपेरणीला सुरुवात झाली व जुलैअखेर बहुतांश पूर्ण झाल्या आहेत.
पनवेल तालुका हे भाताचे कोठार समजले जात होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भातशेती केली जात असे; परंतु औद्योगिकीकरण व शहरीकरण पनवेलच्या ग्रामीण भागाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले असल्याने या ठिकाणचे शेती क्षेत्र कमी झाले आहे.
तळोजासारखी औद्योगिक वसाहत, पनवेलच्या पूर्व भागात आलेले मोठमोठे गृहप्रकल्प व फार्म हाऊस संस्कृतीमुळे शेती क्षेत्र कमी झाले आहे. यातमध्ये मागील दोन वर्षांपासून अवकाळी व चक्रीवादळामुळे लोकांचा कल भाजीपाला, फळबागांकडे वाढला आहे. परिणामी यंदा भातपिकाच्या क्षेत्रांत घट झाली आहे.
१३२ हेक्टर क्षेत्रांत फळ, भाजीपाला
पनवेल तालुक्यात ६,२०१.५३ हेक्टरवरवर शेती केली जाते. यामध्ये यंदा ६,०२१.२८ हेक्टरवर भातपेरणी करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण कमी झाले आहे. तसेच यंदा १३२.५८ हेक्टरवर फळ व भाजीपाला लागवड केली गेली आहे. ६१.२८ हेक्टर क्षेत्रावर नागली पीक घेतले जात आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी भातपिकाचे क्षेत्र कमी झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी शरद गीते यांनी दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.