Maize Arrival : दौंड तालुक्यात मक्याच्या आवकेत घट, दरात वाढ

Maize Market : क्विंटलला २३१० रूपये दर; भाजीपाला आवक वाढली
Maize Market
Maize MarketAgrowon
Published on
Updated on

Maze Price : दौंड : दौंड तालुक्यात मक्याची आवक घटली आहे. दरात वाढ झाली आहे. मक्याची ८० क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतवारीनुसार किमान १९५० रूपये तर कमाल २३१० प्रतिक्विंटल दर मिळाला.

मागील आठवड्यात मक्याची ९० क्विंटल आवक होऊन त्यास किमान १८०० व कमाल २२५० रूपये दर मिळाला होता.

दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली आहे. बाजारभाव स्थिर आहे. केडगाव उपबाजारात भुसार मालाची आवक घटली आहे.

दर स्थिर आहे. केडगाव उपबाजारात कांद्याची ४३२३ क्विंटल आवक होऊन त्यास किमान ५०० तर कमाल २२०० रूपये दर मिळाला.

Maize Market
Maize, Chana Market Update : मक्याच्या दरात घट; हरभरा स्थिर

कोथिंबिरीची ८२४० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ३०० रूपये तर कमाल १००० रूपये जुड्यांचा दर मिळाला. मेथीची ५४१८ जुड्या आवक होऊन त्यास शेकडा किमान ५०० व कमाल १२०० रूपये दर मिळाला.

कांदापातीच्या २६८ जुडींची आवक होऊन त्यास शेकडा किमान ६०० व कमाल १२०० रूपये दर मिळाला. लिंबाची १७० डाग आवक झाली असून प्रतवारीनुसार किमान २५१ व कमाल ६५१ रूपये प्रति डाग दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com