Pune News: सरकारने तात्काळ सरसकट आर्थिक मदत जाहीर करून 'ओला दुष्काळ घोषित केला नाही, तर राज्यातील परिस्थिती नेपाळसारखी करु', शेतकरी आता एकवटले आहेत. शेतकरी आता थांबणार नाही असा इशारा सिंदखेडराजा येथील दिलीप चौधरी यांनी दिला आहे. त्यामुळे संकटाच्या काळात सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे. तसेच तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी त्यांची मागणी आहे..मागील काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती, बाजारातील घसरलेले दर आणि सरकारी आश्वासनांतुन होणारी फसवणूक यामुळे शेतकरी संकटात आहेत. तसेच, सध्या सुरु असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील सततच्या पावसामुळे लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचा घास हिरावला आहे..Farmer Issue: आत्महत्या, की व्यवस्थेचा बळी!.सरकारच्या ‘सेवा पंधरवडा’ उपक्रमाचा काळ चालू असतानाही शेतकऱ्यांकडे कोणी लक्ष देत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचणी वाढतच आहे, अशी नाराजी शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत आहे. या पावसामुळे आत्तापर्यंत एक लाख हेक्टरहून अधिक शेतीच नुकसान झाल आहे. मात्र,अजुनही कुणी याकडे लक्ष दिले नाही आणि कुणी पाहणीस आलेले नाही. तसेच, पिकांच्या नुकसानीचे पंचनामेही झाले नाहीत, अशी कैफियत स्थानिक शेतकऱ्यांकडून होत आहे..Vijay Wadettiwar: शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या: विजय वडेट्टीवार यांची मागणी.किसान काँग्रेसचे आंदोलनया परिस्थितीला विरोध म्हणून, किसान काँग्रेसने मलकापूर कृषी कार्यालयात गोधडी टाकून भजन आंदोलन सुरू केले आहे.मागील वर्षी सरकारकडून मलकापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पीक नुकसान झाले होते..पंचनाम्यानंतर हजारो शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झाला, पण प्रत्यक्षात केवळ काहीशा शेतकऱ्यांनाच रक्कम मिळाली. बाकीचे शेतकरी अजूनही भरपाईपासून लांबच आहेत. प्रत्यक्षात फक्त ४०० ते ५०० शेतकऱ्यांनाच विम्याची रक्कम मिळाली आहे.त्यामुळे जोपर्यंत कृषी अधिकारी लेखी आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत कृषी कार्यालय सोडणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.